मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Aurangabad Police : शहरातील कोणतेही पोलीस ठाणे उडवून टाकणार औरंगाबाद पोलिसांना आलेल्या फोनमुळे खळबळ

Aurangabad Police : शहरातील कोणतेही पोलीस ठाणे उडवून टाकणार औरंगाबाद पोलिसांना आलेल्या फोनमुळे खळबळ

औरंगाबादमध्ये पोलिसांच्या 112 हेल्पलाईन नंबरवर पोलीस स्टेशन उडवून देण्याचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमध्ये पोलिसांच्या 112 हेल्पलाईन नंबरवर पोलीस स्टेशन उडवून देण्याचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमध्ये पोलिसांच्या 112 हेल्पलाईन नंबरवर पोलीस स्टेशन उडवून देण्याचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

औरंगाबाद, 31 ऑगस्ट : औरंगाबादमध्ये पोलिसांच्या 112 हेल्पलाईन नंबरवर पोलीस स्टेशन उडवून देण्याचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. (Aurangabad Police) चार वेळा फोन करून शहरातील कोणतेही पोलीस ठाणे उडवून देणार असा धमकीचा फोन आल्याने औरंगाबाद पोलीस ठाण्यात मोठा धावाधाव सुरू झाली. दरम्यान तातडीने पोलीस स्टेशन उडवून देणाऱ्याचा पोलिसांनी शोध घेतल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास घेतला. टाईमपास म्हणून पोलीस स्टेशन उडवून देण्याच्या धमकीचा फोन केल्याची युवकाने नंतर कबुली दिली. शुभम वैभव काळे असे औरंगाबाद येथील तरुणाचे नाव आहे. त्या युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपी शुभम काळेची चौकशी केल्यावर आपण टाइमपास म्हणून नियंत्रण कक्षाला फोन केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणाच्या विरोधात अंमलदार अरविंद मेने यांच्या तक्रारीवरुन आदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, सहायक उपनिरीक्षक सतीश जाधव, हवालदार जितेंद्र ठाकुर, संजय राजपुत, विठ्ठल सुरे यांनी पार पाडली.

हे ही वाचा : जमिनीच्या वादातून आधी तलवारीने वार, नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, नगरमधील घटना

नेमकं काय घडलं

औरंगाबाद पोलीस ठाण्यात काल दुपारी दुपारच्या वेळी 112 या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर धमकीचा कॉल आला. यावेळी पोलीस सर्तक होत तातडीने शोधाशोध सुरू केली. कोणत्याही वेळी कोणतेही पोलीस ठाणे उडविणार, असा धमकीचा कॉल आला. हा धमकीच्या कॉल आल्याने सर्व पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. आणि काही वेळातच पोलिसांनी कॉल करणाऱ्याला पकडले. हा एक तरुण आहे आणि पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यानंतर त्याने जे उत्तर दिले यामुळे पोलिसांचा संताप झाला.

टाइमपास म्हणून कॉल केला, असे पोलिसांच्या चौकशीतून समोर आल्याने पोलिसही हैराण झाले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आदखलपात्र गुन्ह्या नोंदवण्यात आला आहे. शुभम वैभव काळे (23, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

हे ही वाचा : death by drowning : सुट्टीदिवशी पोहायला गेलेल्या दोन भारतीय मुलांचा ब्रिटनमध्ये तलावात बुडून मृत्यू

नियंत्रण कक्षाच्या 112 नंबरवर शुभमने तब्बल चार वेळा फोन करून शहरातील पोलीस ठाणे काही वेळात उडविण्यात येणार, अशी धमकी दिली. ऐन गणेशोत्सवाच्या प्रश्वभीमीवर आलेल्या धमकीचे गांभीर्य ओळखून संपूर्ण पोलीस यंत्रण सतर्क झाली. आलेल्या क्रमांकाचे मोबाइल लोकेशन शोधण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाइलच्या लोकेशनद्वारे आरोपी शुभमला चिकलठाणा औद्योगिक वसाहत परिसरातून पकडले.

First published:
top videos

    Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime, Crime news, Police, Police arrest