जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / death by drowning : सुट्टीदिवशी पोहायला गेलेल्या दोन भारतीय मुलांचा ब्रिटनमध्ये तलावात बुडून मृत्यू

death by drowning : सुट्टीदिवशी पोहायला गेलेल्या दोन भारतीय मुलांचा ब्रिटनमध्ये तलावात बुडून मृत्यू

death by drowning : सुट्टीदिवशी पोहायला गेलेल्या दोन भारतीय मुलांचा ब्रिटनमध्ये तलावात बुडून मृत्यू

ब्रिटनमध्ये राहत असलेल्या दोन भारतीयांच्या उत्तर आयर्लंडमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोघेही मुळचे केरळ राज्यातील होते. (death by drowning)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : ब्रिटनमध्ये राहत असलेल्या दोन भारतीयांच्या उत्तर आयर्लंडमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोघेही मुळचे केरळ राज्यातील होते. (death by drowning) जोसेफ सेबॅस्टियन आणि रुवेन सायमन अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघेही अवघ्या 16 वर्षांचे होते. सोमवारी सुट्टी असल्याने शहरातील तलावात पोहण्यासाठी गेले होते यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्यासोबत अजून काही मित्र गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आहेत. त्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना बाहेर काढले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

जाहिरात

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या दोन युवकांच्या मृत्यूनंतर केरळ असोसिएशनकडून या दोघांना काल (दि.30) उत्तर आयर्लंडमधील डेरी/लंडनडेरी शहरात श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान ते पाण्यात बुडाल्यानंतर नागरिकांनी तात्काळ पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले पंरतु त्या दोघांचाही पाण्यातच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले.

हे ही वाचा :  संतापजनक! खेळता खेळता मुलीला शेतात नेले, नंतर बलात्कार करुन गुप्तांगावर वार

दरम्यान याबाबत भारतीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे असोसिएशनच्या प्रवक्त्याकडून स्पष्ट करण्यात आले. केरळमधील 16 वर्षीय दोन तरुणांचा रुवेन सायमन आणि जोसेफ सेबॅस्टियनच्या इंघ लॉफ येथे मृत्यू झाला आहे. आम्ही त्यांच्या कुटूंबियांच्या दुखात सामील असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर उत्तर आयर्लंड पोलीस सर्व्हिस (पीएसएआय) ने या घटनेबाबत एक निवेदन जाहीर करुन या दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले.

जाहिरात

भारतीय युवकांचा मृत्यू झाला असून दोघांनाही पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. स्थानिक नगरसेवक रॅचेल फर्ग्युसन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून कौन्सिलर फर्ग्युसन यांनी ट्विट केले आहे.

हे ही वाचा :  मालेगाव हादरलं! स्विमिंग पूलमध्ये उतरताच तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका, सीसीटीव्हीत घटना कैद

जाहिरात

या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे, या दुःखद प्रसंगात आम्ही तुमच्यासोबत आहोत. ही घटना घडल्यानंतर मुलांचा जीव वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा ऋणी असल्याचे सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात