जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : दसऱ्याच्या दिवशी रावणाचं नाही तर शूर्पणखेचं दहन, पत्नी पीडित संघटनेने मांडली व्यथा, VIDEO

Aurangabad : दसऱ्याच्या दिवशी रावणाचं नाही तर शूर्पणखेचं दहन, पत्नी पीडित संघटनेने मांडली व्यथा, VIDEO

Aurangabad : दसऱ्याच्या दिवशी रावणाचं नाही तर शूर्पणखेचं दहन, पत्नी पीडित संघटनेने मांडली व्यथा, VIDEO

औरंगाबाद मध्ये पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या सदस्यांकडून रावणाची बहीण शूर्पणखा हिचा पुतळा दहन करून पतीचा छळ करणाऱ्या पत्नीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 05 ऑक्टोबर : दसऱ्याच्या  दिवशी सर्वत्र रावण दहन केले जाते. मात्र,औरंगाबाद शहरातील पत्नी पीडित पुरुष संघटनेकडून अनोख्या पद्धतीने दसरा सण साजरा केला गेला. पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या पत्नी पीडित पुरुष  संघटनेच्या सदस्यांकडून रावणाची बहीण शूर्पणखा हिचा पुतळा दहन करून पतीचा छळ करणाऱ्या पत्नीचा निषेध  व्यक्त करण्यात आला. ज्याप्रमाणे महिलांचा पुरुषांकडून शारीरिक व मानसिक छळ होतो. त्याचप्रमाणे पुरुषांचाही महिलांकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांकडून पुरुषांच्या तक्रारी वाढत असल्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये पत्नी पीडित पुरुषांची एक पत्नीपीडित पुरुष संघटना तयार झाली आहे. या संघटनेच्या माध्यमातून पत्नीकडून होणाऱ्या अन्याय विरोधात काम करण्याचं बळ व लढण्याचे बळ पत्नीपीडित संघटनेच्या माध्यमातून दिले जाते. यासाठी कायदेशीर बाजू समजावून सांगत त्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. यासोबतच मानसिक आधार देण्याचे काम या संघटनेच्या वतीने केलं जातं. यामुळे पत्नी पीडित असलेले शहरातील पुरुष हे या पत्नी पीडित संघटने सोबत जोडले गेलेले आहेत. शूर्पणखा पुतळा दहन या कार्यक्रमाला यावेळी अध्यक्ष भारत फुलारे, चरण सिंग राजपूत, सोमनाथ मनाल, संजय भांड, भाऊसाहेब साळुंखे, मदन पापडकर, सुरेश फुलारे, विशाल नांदरकर, दासोपंत दहिफळे, अॅड गणेश डहाळे उपस्थित होते. हेही वाचा :  Dasara 2022: तब्बल 40 फूट उंचीच्या महाकाय रावणाचे होणार दहन, पाहा Video आता पुरुषांच्या बाजूने असावेत कायदे भारतातील सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत. हे कायदे पुरुषांच्या विरोधात आणि महिलांच्या बाजूने अधिक आहेत. मात्र, विवाह झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरून वाद होतात. यामध्ये विवाहित पत्नी या कायद्याचा वापर करून पुरुषांवर खटले दाखल करते. यामुळे संबंधित पुरुषाला आयुष्यभर त्या खटल्यांच्या विरोधात लढण्यात आपले आयुष्य घालवावे लागते. यामुळे कायदे पुरुषांच्या बाजूने असावेत अशी मागणी पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या सदस्यांनी यावेळी केली. दसऱ्याच्या दिवशी परंपरेनुसार रावणाचे दहन केलं जातं. त्याच्या वाईट विचारांचे दहन केलं जातं. त्याचप्रमाणे महिलांकडून होणाऱ्या अत्याचार व त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी हे शूर्पणखा पुतळ्याचे दहन पत्नी पीडित संघटनेच्या वतीने करण्यात आले, असं यावेळी  पत्नी पीडित परुष संघटना  संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात