Home /News /maharashtra /

Aurangabad : पर्यटनाच्या राजधानीत विदेशी पर्यटकांचा टक्का घटला; महिन्याकाठी फक्त 400 विदेशी पर्यटक

Aurangabad : पर्यटनाच्या राजधानीत विदेशी पर्यटकांचा टक्का घटला; महिन्याकाठी फक्त 400 विदेशी पर्यटक

title=

पर्यटनाच्या राजधानीत दरवर्षी 64 हजार विदेशी पर्यटक जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात असतात. मात्र कोरोना महामारीच्या काळानंतर गेल्याकाही दिवसांपासून जिल्ह्यात महिन्याकाठी फक्त 400 विदेशी पर्यटक भेटी देत असल्याची आकडेवारी पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    औरंगाबाद, 22 जून : राज्याची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची (Historical City Aurangabad) ओळख आहे. या जिल्ह्यात एकापेक्षा एक पर्यटनस्थळे आहेत. ज्यामध्ये अजिंठा, वेरूळ लेण्या, बिबी -का- मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. जिल्ह्यात जागतिक स्तरावरची पर्यटनस्थळे आहेत. यामुळे जगभरातील विदेशी पर्यटकांची मोठी रेलचेल जिल्ह्यात नेहमी बघायला मिळते. मात्र, कोरोना संक्रमणाच्या दृष्टचक्रात पर्यटन व्यवसाय चांगला अडकला असून याचा मोठा आर्थिक फटका व्यवसायाला बसला आहे. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होत असून पर्यटन व्यवसाय पूर्व पदावर येत आहे. (tourism industry in Aurangabad) वाचा : Aurangabad : विद्यार्थ्यांनो, 3D ॲनिमेशनचा कोर्स करा आणि सुरुवातीलाच 40,000 पगार मिळवा : VIDEO गेल्या दोन वर्षापुर्वी जगभर आवर्ती धोरणाचे सावट आले आणि यामुळे संपूर्ण जग ठप्प झाले. दरम्यान कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर संपूर्ण व्यवहार पूर्वपदावर आले मात्र कोरोना महामारीचा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय विमानसेवा वरती झाला आणि यामुळे पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे. महिन्याकाठी फक्त 400 विदेशी पर्यटक पर्यटनाच्या राजधानीत दरवर्षी 64 हजार विदेशी पर्यटक जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात असतात. मात्र कोरोना महामारीच्या काळानंतर गेल्याकाही दिवसांपासून जिल्ह्यात महिन्याकाठी फक्त 400 विदेशी पर्यटक भेटी देत असल्याची आकडेवारी पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे. वाचा : Aurangabad : बारावी नुकतीच झालीय? तर फक्त 'हा' कोर्स करा अन् सुरूवातीचा पगारच 30,000 मिळवा पर्यटन व्यवसायावर परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे असल्यामुळे जिल्ह्यात पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेली मोठी अर्थव्यवस्था आहे. या पर्यटन व्यवसाय वरती स्टॉलधारक, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सीचालक अवलंबून आहेत. विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे या लहानांपासून मोठ्या व्यावसायिकांवर याचा मोठा परिणाम झाला असल्याचं व्यवसायिकांचे मत आहे.
    First published:

    Tags: Aurangabad News, Corona, Tour

    पुढील बातम्या