Aurangabad : बारावी नुकतीच झालीय? तर फक्त 'हा' कोर्स करा अन् सुरूवातीचा पगारच 30,000 मिळवा
Aurangabad : बारावी नुकतीच झालीय? तर फक्त 'हा' कोर्स करा अन् सुरूवातीचा पगारच 30,000 मिळवा
देवगिरी काॅलेज
बारावी झालेल्या विद्यार्थ्य़ांनो जरा इकडं लक्ष द्या. कारण, ज्वेलरी मेकिंगचा कोर्स केला तर, लवकरच 30,000 रूपयांची नोकरी मिळू शकते. इतकंच नाही, तर परदेशातही काम करण्याची संधी मिळते.
औरंगाबाद, 21 जून : तुम्हाला डायमंडमध्ये आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयात 'बी हॉक ज्वेलरी डिझाईन' (B Hawk Jewelry Design Course) हा कोर्स सुरू झालेला आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना डायमंडविषयी बारकावे शिकवले जातात. डायमंडमध्ये अनेक प्रकार असल्यामुळे या क्षेत्राचा आवाका मोठा आहे, यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या प्रचंड संधी (Job opportunities) आहेत. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घेता येऊ शकतो.
या कोर्ससाठी प्रवेश कसा घ्याल?
देवगिरी महाविद्यालयात बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 'बी हाॅक ज्वेलरी डिझाईन' हा कोर्स 3 वर्षांचा असून यामध्ये पदवी पूर्ण करता येते. या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून येत्या 30 जुलै पर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. या कोर्ससाठी विद्यार्थी संख्या 50 एवढी आहे.
वाचा : Pune : 3 शाखांचा अभ्यास तोही एकाच कोर्समध्ये, मग तर जाॅबच्या संधीच संधी! ‘हा’ आहे MIT चा नवा कोर्स
या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी लागणारे कागदपत्र टीसी ओरिजनल, एसएससी मार्कशीट ओरिजनल, ओरिजनल कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे लागतात. या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एससी कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप उपलब्ध असल्याचं महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. कोर्ससाठी वर्षाची फी 12 हजार 500 रुपये एवढी आहे.
नोकरीची सुरूवातच 30 हजार पगारापासून...
देवगिरी महाविद्यालयात होणाऱ्या कोर्ससाठी विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका, इंडियन जेमोलॉजिकल लॅबरोटरी, डीएचएस इंटरनॅशनल अँड गेम्स लॅब, गुड्स गेम जयपूर या कंपन्यांमध्ये टाईप करण्यात आलेला आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरुवातीला किमान 25 ते 30 हजार रुपये पगार मिळू शकतो. महाविद्यालयातील विद्यार्थी परदेशात देखील गेलेले आहेत. यामध्ये सौदी अरेबिया कतार युके या देशांचा समावेश आहे. त्यासोबतच या क्षेत्रात नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायावर चांगला पैसा कमावता येऊ शकतो, असे देखील या महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले.
गुगल मॅपवरून साभार...
कुठं हा कोर्स करू शकता?
तुम्हाला या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल, तर deogiricollege.org या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता किंवा अर्ज करू शकता. 0240-2376340 किंवा 9867726697 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर shruti.rakshe@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करू शकता. रचनाकर कॉलनी, न्यू उस्मानपुरा, औरंगाबाद, महाराष्ट्र 431005 हा या काॅलेजचा पत्ता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.