Home /News /maharashtra /

Aurangabad : विद्यार्थ्यांनो, 3D ॲनिमेशनचा कोर्स करा आणि सुरुवातीलाच 40,000 पगार मिळवा : VIDEO

Aurangabad : विद्यार्थ्यांनो, 3D ॲनिमेशनचा कोर्स करा आणि सुरुवातीलाच 40,000 पगार मिळवा : VIDEO

आता करिअर करायंच असेल तर 3D animation हे क्षेत्र सर्वांत बेस्ट आहे. कारण, प्रत्येक क्षेत्रात 3D animation चा वापर होत आहे. तसेच हा कोर्स केला तर परदेशात नोकरीची संधी आहे, तसेच आपल्या इथंही किमान 40 हजार सुरूवातीला पगार मिळू शकतो.

  औरंगाबाद, 21 जून : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ॲनिमेशन गेमिंग 3D क्षेत्राला (3D animation course) खूप महत्त्व आलं आहे. दिवसेंदिवस या क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. यामुळे क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे बारावीनंतर तुम्ही पारंपारिक शिक्षण क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांमध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल तर मल्टिमीडिया अँड अनिमेशन क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता आणि यामध्ये तुम्ही चांगला रोजगार मिळवू शकता. मल्टिमीडिया अँड अनिमेशनचे शिक्षण कसे घेता येईल, असा प्रश्न पडला असेल तर खालील स्टोरी वाचू शकता. (3D animation course started in Devagiri College) कोणती कागदपत्रे आवश्यक? औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या देवगिरी महाविद्यालयात 'बी हूक मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन' हा कोर्स सुरू झाला आहे. हा कोर्स 3 वर्षांचा असून यामध्ये बारावी उत्तीर्ण गरजेचं आहे. 30 विद्यार्थ्यांची बॅच असते. यासाठी लागणारे कागदपत्र टीसी ओरिजनल, एसएससी मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे लागतात. वाचा : Thalapathy Vijay B’day: 500 रुपयांपासून सुरुवात आज एका चित्रपटासाठी घेतो 100 कोटी;तुम्हाला माहितेय का विजयची संपत्ती? किती फी आहे?  मल्टी मीडिया अँड ॲनिमेशन या क्षेत्राचे महत्त्व वाढत असल्यामुळे या क्षेत्रात शिक्षण घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये या कोर्सची फी 1 ते दीड लाखांपर्यंत आहे. मात्र औरंगाबाद शहरामध्ये सुरू झालेला हा कोर्स 12, 285 रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना करता येऊ शकतो. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला हा कोर्स करून स्वतःचं करिअर घडवता येऊ शकते. एसी कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप उपलब्ध आहे. जॉबच्या संधी कशा आहेत? या क्षेत्रात ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटिर, मल्टीमीडिया डेव्हलपर, गेम डेव्हलपर, गेम डिझायनर, कॅरेक्टर डेसिग्नेर्स, की फ्रेम एनिमेटर्स, कॅमेरा ऑपरेटर, थ्रीडी मॉडेलर्स, 3D अनीमेटर, 2D अनिमेटर, लेआऊट आर्टिस्ट्स, लायटिंग आर्टिस्ट, टेक्चर आर्टिस्ट, कॉन्सेप्ट आर्टीस्ट,VFX आर्टिस्ट, स्क्रिप्ट राईटर, डिजिटल पेंटर, वेब डिझायनर, प्रोडक्शन डिझायनर, कंपोसीटर अशा विविध संधी उपलब्ध आहेत. एडव्हर्टायझिंग, टीव्ही, चित्रपट, ऑनलाइन, प्रिंट मीडिया, कार्टून प्रोडक्शन, ई-लर्निंग, व्हिडीओ गेम इ. ठिकाणीसुद्धा संधी उपलब्ध आहेत. तुम्ही Freelancer, Fiverr किंवा Upwork सारख्या फ्रीलान्सींग प्लॅटफॉर्म वर फ्रीलान्सिग करून पण पैसे कमावू शकता. वाचा : bhagat sinh koshyari : एकनाथ शिंदेंच्या मिशन लोट्सला लागणार ब्रेक, राज्यपाल हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोनाची लागण सुरूवातीचा पगार किती असतो? हा कोर्स केल्यानंतर सुरूवातीलाच  35,000 ते 40,000 पगार घेऊ शकता. शिवाय भत्ते वेगळे मिळतात. तसेच या क्षेत्रात देशाबाहेर नोकरीची संधी उपलब्ध आहेत. ज्यात जपान, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंग्डम आणि साऊथ कोरिया या क्षेत्रात करिअर संधी आहेत.

  गुगल मॅपवरून साभार...

  संपर्क कसा साधाल? तुम्हाला एक वर संदर्भात अधिक माहिती घ्यायची असेल तर महाविद्यालयाची ही deogiricollege.org लिंक तुम्ही शोधू शकता. महाविद्यालयाचा संपर्क 0240-2367336, 2367411 किंवा 07588643449 तर मेल आयडी rahul.mohite888@gmail.com आहे.
  First published:

  Tags: Career, Career opportunities, जॉब

  पुढील बातम्या