Home /News /maharashtra /

'पंतप्रधानांचा फोटो कचरा कुंडीला, पण देशाने का माफी मागायची? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

'पंतप्रधानांचा फोटो कचरा कुंडीला, पण देशाने का माफी मागायची? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

, देशाने काय केलं. गुन्हा केला आहे. तो भाजपने केला आहे. भाजपच्या तीनपाट प्रवक्त्याने केला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही

, देशाने काय केलं. गुन्हा केला आहे. तो भाजपने केला आहे. भाजपच्या तीनपाट प्रवक्त्याने केला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही

, देशाने काय केलं. गुन्हा केला आहे. तो भाजपने केला आहे. भाजपच्या तीनपाट प्रवक्त्याने केला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही

    औरंगाबाद, 8 जून : 'आपल्या देवदैवतांचा कुणी अपमान करायचा नाही, असं वाटत आहे तसंच त्यांनाही वाटत असेल. तो अपमान केल्यानंतर सर्व अरब देश एकत्र आले आणि पंतप्रधानांना माफी मागायला लावली. राजकीय मतभिन्नता असेल. पण, पंतप्रधान हे देशांचे आहे. त्यांचा फोटो कचरा कुंडीवर लावला जात आहे.  कुणामुळे ही परिस्थिती आली आहे, त्यांच्यामुळे देशाने का माफी मागायची, देशाने काय केलं? असा परखड सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery Speech at aurangabad) यांनी भाजपला विचारला. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट अशी सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर वाद पेटला आहे. या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला सवाल विचारला. 'आज एका भाजपच्या प्रवक्त्याने प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला. काय संबंध होता. आपल्या देवदैवतांचा कुणी अपमान करायचा नाही, असं वाटत आहे. तसंच त्यांनाही वाटत असेल. तो अपमान केला नंतर सर्व अरब देश एकत्र आले आणि पंतप्रधानांना माफी  मागायला लावली. राजकीय मतभिन्नता असेल. पण, पंतप्रधान हे देशांचे आहे. त्यांचा फोटो कचरा कुंडीवर लावला जात आहे.  कुणामुळे ही परिस्थिती आली आहे, त्यांच्यामुळे देशाने का माफी मागायची, देशाने काय केलं. गुन्हा केला आहे. तो भाजपने केला आहे. भाजपच्या तीनपाट प्रवक्त्याने केला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही' असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. 'तुम्हाला काय निवडायचे ते निवडा, भाजपच्या तीनपाट प्रवक्त्यामुळे देशाच्या पंतप्रधानाचा फोटो कचरा कुंडीवर लावला जातो. गुन्हा भाजपच्या प्रवक्त्याने केलेला आहे. ते देशाचे प्रवक्ते नाही. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही. भाजपच्या तीनपाट प्रवक्त्यामुळे देशावर जी नामुष्की ओढावली ते तुम्हाला मान्य आहे का? अशी प्रवृती असेल आणि आम्ही तुमच्या मागे यायचं हे, अजिबात होणार नाही' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 'बाळासाहेबांनी कधीही इस्लाम किंवा मुस्लिमांवर बोलताना मुसलमान म्हणून द्वेष करा, असं सांगितलेलं नाही. तसं ते सांगूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कुराण सापडल्यानंतरही जपून ठेवत होते त्या शिवरायांचे संस्कार आमच्यात आहेत. आम्ही द्वेष करत नाही. प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवायचा. घराबाहेर पडतो तेव्हा देश हाच माझा धर्म मानावा. पण दुर्देवाने कुणी त्याच्या धर्माच्या नावाने आमच्या अंगावर आला तर आम्ही या देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या देवदेवतांचा अपमान कुणी करु नये तसं त्यांचंही कुणी करु नये' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 'मोहन भागवंतानी चांगली भूमिका घेतलेली आहे. प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही. इतिहास कुणी पुसू शकत नाही. बरं वाटलं. कारण आता आपण एका नाजूक परिस्थितीतून चाललो आहोत. कोरोनाने तर सगळा हाहा:कार केलेला आहे. पुन्हा डोकंवर काढतो की काय अशी भीती आहे. गाडी रुळावरुन घसरलेली आहे. नोकऱ्या गेलेल्या आहेत. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. कारण लॉकडाऊन होतं. दुसरा पर्याय काय होता? असंही उद्धव ठाकरे म्हणाले. रोजीरोटी, शिक्षण द्यायला पाहिजे. पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलंच सांगितलं की देशाममध्ये विरोधीपक्ष मुळ विषयाला बगल देवून भलत्याच मुद्द्यावर बोलतो आहे. बरोबर आहे. पण पंतप्रधानांना जाणीव नसेल की महाराष्ट्रात विरोधी पक्ष हा भाजप आहे. भाजप सर्व काही नीट सुरु असताना कुणालातरी सुपारी देतंय, कुणाचातरी भोंगा मध्ये वाजतो. कुणालातरी हनुमान चालीसा सुचतं, कोण कुठे खळग्यावर डोकं टेकतं. सगळं व्यवस्थित सुरु असताना हे सगळं घडतं. इथे सु्द्धा काही मुसलमान शिवसैनिक आले असतील.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या