अविनाश कानडजे (औरंगाबाद), 15 जानेवारी : औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये मागच्या 24 तासांत दुसरी खुनाची घटना समोर आली आहे. काल फरशी डोक्यात घालून खून केल्याची माहिती समोर आली होती ही घटना ताजी असताना आता वाळूज औद्योगिक परिसरातील घाणेगावात शीर धडावेगळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बंद पडलेल्या कंपनी परिसरातील असल्याने कोण नसल्याचा अंदाज घेऊन हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. याबाबत अद्यापही सविस्तर माहिती समोर आली नाही.
औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये एकाचा खून करून शीर धडावेगळे करण्यात आले आहे. दरम्यान त्या शिरावर माती टाकून मुजवलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. आज (दि. 15) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान मृताच्या हातावर छत्रपती लिहिलेले असल्याची माहिती दिसून आली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेने वाळूज औद्योगिक वसाहत परिसरात खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : जावयाने सासूला पळवल्याच्या केसमध्ये नवा ट्विस्ट; आधीपासूनच सुरू होतं प्रकरण, म्हणून लेकीसोबत…
24 तासात दोन घटना
औरंगाबाद जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये भर चौकात सकाळच्या दरम्यान खून केल्याची घटना ताजी असताना अशीच एक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे योगेश मस्के या तरुणावर रांजणगाव शेंनपूजी येथील मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. याबाबत औरंगाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे योगेश मस्के या तरुणावर रांजणगाव शेंनपूजी येथील मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. याबाबत औरंगाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान त्या व्यक्तीस गंभीर जखमी केले आहे. जखमी तरुणाला शासकीय घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
हे ही वाचा : दिरासोबत संबंध ठेवावे लागले; हलालास नकार देताच पतीने दिला तिहेरी तलाक, पीडितेची धक्कादायक कहाणी
दरम्यन या प्रकरणी घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी भेट देऊन पाहणी केली. एमआयडीसीमध्ये झालेल्या घटनेचा वाळूज पोलीस हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.