सिरोही, 12 जानेवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या आणि आत्महत्येच्याही घटना उघडकीस येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात आंधळी झालेली 40 वर्षाची सासू आणि 27 वर्षाच्या जावयाची प्रेम कहाणीमध्ये नवीन खुलासा झाला आहे.
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी दोघांबाबत नवा दावा केला आहे. सासूसोबत फरार झालेल्या जावयाचे सासूवर त्याच्या लग्नाआधीपासूनच प्रेम होते. हे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या घरात प्रवेश मिळावा म्हणूनच त्याने तिच्या मुलीशी लग्न केले होते. या दोघांनीही पोलिसांना चकित केले आहे. आतापर्यंत त्यांचा शोध लागला नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सिरोही जिल्ह्यातील रेवदार उपविभागातील अनादरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रेम प्रकरण सध्या चांगचेच गाजत आहे. अनादरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सियाकरा गावातील घरजावई 1 जानेवारी रोजी आपल्या सासूसोबत पळून गेला होता. सासऱ्याला त्याच्या जावयाचे कृत्य माहिती झाल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच जावई नारायण जोगी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस सासू आणि जावई या प्रेमीयुगुलाचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - दिरासोबत संबंध ठेवावे लागले; हलालास नकार देताच पतीने दिला तिहेरी तलाक, पीडितेची धक्कादायक कहाणी
सासऱ्याला माहिती झाले अन् -
जावयाने आपली गर्लफ्रेंड सासूला पळवून नेण्यासाठी आधी दारूची पार्टी ठेवली होती. यानंतर सासरा दारूच्या नशेत असताना जावयाने आपल्या गर्लफ्रेंड सासूला पळवून नेले. दरम्यान, सासऱ्याची दारुची नशा उतरल्यावर त्याला आपली पत्नी आणि जावई दोन्ही घरी आढळले नाहीत. तपास केल्यावर त्याला माहिती झाले की, जावई त्याच्या गर्लफ्रेंड सासूला घेऊन फरार झाला आहे.
या प्रकरणाचा पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत. आपल्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या आपल्या सुनेसोबत पळून गेलेल्या सासूला तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची चारही मुले विवाहित आहेत. तर प्रियकर जावई नारायण जोगी यालाही तीन मुले आहेत. आपल्या गर्लफेड सासूसोबतच आरोपी जावई आपल्या एका मुलीलाही सोबत घेऊन गेला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. याआधी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातही सासू आणि जावयाची प्रेमकहाणी समोर आली होती. मात्र, दोघांनी सामूहिक आत्महत्या केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.