मुंबई 12 जानेवारी : तिहेरी तलाक कायदा लागू होऊन तीन वर्षे झाली आहे, पण ही प्रथा अजून संपलेली नाही. पतीला तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी महिलांना कधी भावाशी तर कधी बहिणीच्या नवऱ्याशी हलाला करावा लागतो. यानंतरही त्यांचे पती त्यांना ठेवायला तयार नाहीत. अनेक महिलांची अवस्था अर्ध्या विधवांसारखी झाली आहे. त्यांना पतीसोबत राहता येत नाही आणि त्यांना कोणता खर्चही मिळत नाही. अशाच एका महिलेची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या संदर्भात ‘दैनिक भास्कर’ने वृत्त दिलंय. आशफिया नावाची महिला उत्तर प्रदेशमधील मेरठची रहिवासी आहे. आशफियाचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं. कायद्याच्या भीतीने तिचा नवरा स्वतः घटस्फोट देत नाहीये. तो आशफियाशी क्रूरपणे वागत आहे, जेणेकरून तिने त्याला घटस्फोट द्यावा. महिला कॅब ड्रायव्हरसोबत घडला अजब प्रकार, बिअरच्या बाटलीने छाती आणि गळ्यावर वार करत धक्कादायक कृत्य आशफिया म्हणते, ‘बर्याच वेळा पतीने मला घटस्फोट देण्यास सांगितलं. सुरुवातीला मी त्याचं म्हणणं फार गांभीर्याने घेतलं नाही. नंतर त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतरही मी घटस्फोट देण्यास राजी न झाल्याने त्याने माझे हात-पाय बांधून मला मारहाण केली. तोंडात कापडाचा बोळा कोंबला. तसंच गळ्याला फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी मेले, असं समजून तो निघून गेला. त्यानंतर मी पंचायत बोलावली. तिथं पतीने माझ्या कुटुंबीयांची माफी मागितली आणि तो माझ्याबरोबर नीट वागेल, असं म्हणाला. पण काही दिवसांनी तो घरातून गायब राहू लागला. तो कधी-कधीच घरी यायचा आणि आला तरी काही वेळाने काही तरी बहाणा करून निघून जायचा." “एकेदिवशी रात्री मी याचं कारण विचारलं असता त्याने मला दोन-तीन कानशिलात लगावल्या. मला काही समजण्याआधीच त्याने माझं डोकं कपाटावर आदळलं. मी खाली पडले आणि त्याने लाथा-बुक्क्यांचा वर्षाव सुरू केला. मी जोरात ओरडू लागले तर, त्याने माझ्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. हातपाय बांधून पूर्ण खोलीभर ओढलं, त्यानंतर माझा गळा दाबला. मी दोन आठवडे रुग्णालयात होते. माझे सासू-सासरे माझ्या प्रकृतीची विचारपूस करायला आले नाहीत आणि मला पोलिसांकडूनही मदत मिळाली नाही,” असं आशफियाने सांगितलं. फक्त आशफियाच नाही, तर तिच्यासारख्या अनेक मुस्लीम महिलांचं आयुष्य तिहेरी तलाकमुळे उद्ध्वस्त झालंय. त्यांना पतीबरोबर राहताही येत नाही आणि मुलांच्या जबाबदाऱ्याही स्वतः घ्याव्या लागतात. यावर तिहेरी तलाकचा खटला लढणाऱ्या वकील काय म्हणतात सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकचा खटला लढणाऱ्या वकील अर्चना पाठक म्हणतात, “कायदा लागू झाल्यानंतर तिहेरी तलाकची प्रकरणं कमी झाली आहेत, पण थांबलेली नाहीत. जागरूकतेअभावी मुस्लिम महिलांना त्याचा वापर करता येत नाही. जर, महिलांनी एफआयआर केला तर पुरुष पळून जातात. पोलिसही त्यांना शोधण्यासाठी तातडीने कारवाई करत नाहीत. तलाकनंतर पोलिसांनी पडकल्यावर आरोपी तलाक दिलाच नसल्याचं म्हणतात किंवा तिथेच तडजोड करतात." तीन पद्धतीने तलाक देतात मुस्लीम सापाला मारल्याच्या गुन्ह्यात तरुण फरार; पोलिसांनी सापाचं पोस्टमार्टम केलं अन्… तलाक-ए-हसन यामध्ये पती एकेक महिन्याच्या अंतराने पत्नीला तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणतो. यात पती पत्नीला तेव्हा तलाक म्हणू शकतो, जेव्हा तिची मासिक पाळी सुरू नसेल. यादरम्यान त्यांच्यात तडजोड करण्याचा प्रयत्नही केला जातो. पण, त्यातूनही काहीच मार्ग निघाला नाही, तर तिसऱ्यांदा तलाक म्हटल्यावर घटस्फोट होतो. तलाक-ए-अहसन यामध्ये तीन वेळा तलाक म्हणणं गरजेचं नाही. नवरा एकदा तलाक म्हणतो आणि नंतर नवरा-बायको दोघंही एकाच छताखाली तीन महिने वेगळे राहतात. पती या तीन महिन्यांत तलाक वापस घेऊ शकतो. असं न झाल्यास तिसऱ्या महिन्यात तलाक होतो. इन्स्टंट तलाक किंवा ट्रिपल तलाक यामध्ये पती एकदाच लिहून किंवा तीन वेळा तलाक म्हणून पत्नीला तलाक देऊ शकतो. यानंतर ते वेगळे होतात. पण आता तीन तलाक कायद्याने गुन्हा आहे. असं केल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. 2017 साली पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने तिहेरी तलाक कायद्याने गुन्हा ठरवला होता आणि 2019 मध्ये या संदर्भात कायदा तयार करण्यात आला होता. दरम्यान, आता महिला तलाक-ए-हसन व तलाक-ए-अहसनवरही बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हलाला म्हणजे काय? मुस्लीम पर्सनल लॉ नुसार, कोणत्याही मुस्लीम महिलेचा तलाक झाल्यानंतर पुन्हा तिच्या पतीशीच लग्न करायचं असेल तर तिला इतर कोणत्याही पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवावे लागतात. त्यानंतरच ती तिच्या पतीशी पुन्हा लग्न करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.