मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad Police : आधी तरुणीची काढली छेड; मग पोलीस घरी येताच केला आत्महत्येचा बनाव

Aurangabad Police : आधी तरुणीची काढली छेड; मग पोलीस घरी येताच केला आत्महत्येचा बनाव

औरंगाबाद शहरात एका टवाळ पोराने  मुलीची छेड काढली. याबाबतची तक्रार पोलिसांकडे गेल्याचे कळताच तरुणाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्येचा बनाव केला.

औरंगाबाद शहरात एका टवाळ पोराने मुलीची छेड काढली. याबाबतची तक्रार पोलिसांकडे गेल्याचे कळताच तरुणाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्येचा बनाव केला.

औरंगाबाद शहरात एका टवाळ पोराने मुलीची छेड काढली. याबाबतची तक्रार पोलिसांकडे गेल्याचे कळताच तरुणाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्येचा बनाव केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

अविनाश कानडजे (औरंगाबाद) 06 ऑक्टोंबर : औरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन मुलींच्या वस्तीगृहाजवळ मुलीची एका टवाळ पोराने छेड काढली. याबाबतची तक्रार पोलिसांकडे गेल्याचे कळताच तरुणाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्येचा बनाव केला. त्यामुळे छेडछाडीचा कॉल सोडून क्रांती चौक पोलिसांनी तरुणाच्या घरी धाव घेतली. दरम्यान या घटनेने खळबळ माजली होती. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच आत्महत्येचा बनाव करणाऱ्या तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली. दरम्यान घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना त्याने सगळेच सांगून टाकले.

सरस्वती भुवन मुलींच्या वस्तीगृहाजवळ 19 वर्षीय साईनाथ नावाचा तरुण मुलीची छेड काढत असल्याची तक्रार क्रांती चौक पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नोंद घेत तात्काळ त्याचे घर गाठले. तेव्हा साईनाथच्या खोलीत छताला साडी बांधलेली होती तर तो जमिनीवर झोपलेला होता पोलिसांना संशया आला त्याच्या अंगावर पाणी टाकले यामुळे पोलखोल झाल्याने तो घडा घडा बोलायला लागला.

हे ही वाचा : #कायद्याचंबोला: पर्सनल व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी; घाबरू नका, तुमचं नाव बाहेर न येता होईल बंदोबस्त

त्यामुळे छेडछाडीचा कॉल सोडून क्रांती चौक पोलिसांनी तरुणाच्या घरी धाव घेतली. दरम्यान या घटनेने खळबळ माजली होती. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच आत्महत्येचा बनाव करणाऱ्या तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली. दरम्यान घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना त्याने सगळेच सांगून टाकले.

मुंबईतही अशाच घटनेनं खळबळ

गेल्या काही दिवसात मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणत मुलांच्या अपहरणाचे फेक मॅसेज समाज माध्यमातून व्हायरल होत आहेत. याचा वाईट परिणाम आता लहान मुलांवर देखील होताना दिसत आहे. घाटकोपरमध्ये एका 11 वर्षाच्या विध्यार्थ्यांने शाळेत जायचे नाही म्हणून स्वतःचेच किडनॅपिंग झाल्याचा बनाव रचला. यामुळे घाटकोपर पोलोसांची काही तास पळता भुई थोडी झाली. परंतु नंतर हा त्या मुलानेच बनाव केला असल्याचे कबूल केले.

घाटकोपरच्या अशोक नगर विभागात राहणाऱ्या या 11 वर्षीय मुलाला कमी मार्क्स पडले होते. त्यामुळे शाळेत पडणारा ओरडा नको होता. अशातच मोठ्या भावाच्या मोबाईलवर अपहरणाचे फेक मॅसेज त्याने पाहिले होते. मग आपल्याला ही असे किडनॅपिंग झाल्याचे घरच्यांना सांगितले.

हे ही वाचा : पत्नीसोबत झालं भांडण, उचललं टोकाचं पाऊल; प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या

घरच्यांनी मुलाला सोबत घेऊन घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. मुलाने आपल्याला शाळेत जात असताना दोन जणांनी चालू रिक्षात ओढून अपहरण करण्याचा प्रयत्न केला, माझे तोंड दाबले पण मी उडी मारली आणि पळून आलो असे त्याने पोलीस अधिकाऱ्यांना ही सांगितले.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Police, Suicide attempt