मुंबई, 6 ऑक्टोबर- गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या झालेल्या अनेक बातम्या समोर येत आहेत. सर्व सामान्यच नव्हे तर मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारांनीसुद्धा हे टोकाचं पाऊल उचलत सर्वांना धक्का दिला आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या आत्महत्येची केस पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीने हॉटेलच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली होती. या बातमीने हादरुन गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत सर्वांना हादरवून सोडलं आहे.
प्रसिद्ध तामिळ अभिनेता-दिग्दर्शक लोकेश राजेंद्रनने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. अवघ्या 34व्या वर्षी या टीव्ही अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचललल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकेशने एक बालकलाकार इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. एक उत्तम अभिनेता-दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. या वृत्तानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लोकेश आणि पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता.
घटस्फोटामुळे चिंतेत-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकेश राजेंद्रनचं लग्न झालं होतं. आणि त्याला दोन मुलेदेखील आहेत. अभिनेत्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ एका महिन्यापूर्वी त्यांना समजलं होतं की, लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काहीतरी वाद सुरु आहे.चार दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठवली होती. तो या सर्व गोष्टींमुळे प्रचंड तणावात होता. आपण लोकेशला शुक्रवारी शेवटचं पाहिलं असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. त्याने आपल्याला काही पैशांची गेज असल्याचं सांगत वडिलांजवळून काही पैसे घेतले होते.
तणावामुळे मद्यपानला सुरुवात-
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, वैवाहिक आयुष्यात सुरु असलेल्या चढ-उतारांमुळे लोकेश प्रचंड तणावात होता. यातूनच त्याला मद्यपान करण्याची सवय जडली होती. तो दररोज मद्य प्राशन करु लागला होता. त्यातच तो दररोज चेन्नई मुफस्सल टर्मिनलझोपलेला दिसून येत असे.
(हे वाचा: केकेनंतर आणखी एका गायकाचा लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का )
अभिनय कारकीर्द-
लोकेश राजेंद्रने एक बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याला 'मरमादेशम' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. अभिनेत्याच्या वडिलांच्या मते, या अभिनेत्याने जवळजवळ 150मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नव्हे तर लोकेशने सुपरस्टार प्रभू, विजयकांत यांच्यासोबत चित्रपटातसुद्धा काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Entertainment