जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हिंदू-मुस्लीम ऐक्याचा खुलताबादचा उरुस, पैगंबरांच्या पवित्र पोशाखाचे होणार दर्शन, Video

हिंदू-मुस्लीम ऐक्याचा खुलताबादचा उरुस, पैगंबरांच्या पवित्र पोशाखाचे होणार दर्शन, Video

हिंदू-मुस्लीम ऐक्याचा खुलताबादचा उरुस, पैगंबरांच्या पवित्र पोशाखाचे होणार दर्शन, Video

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील उरुसाला सुरुवात झाली असून सर्वधर्मीय भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहिला मिळत आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद 07 ऑक्टोबर : जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये सर्वात मोठा उरुस भरवला जातो. या ठिकाणी महाराष्ट्रासह विविध राज्यातील सर्वधर्मीय भाविक या उरुसामध्ये सहभागी होत असतात. कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा निर्बंध मुक्त वातावरणामध्ये या उरुसाला मंगळवार पासून सुरुवात झाली असून या ठिकाणी सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याला मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. यासोबतच खुलताबाद तालुक्यामध्ये हजरत ख्वाजा मुन्तजबद्दीन जर जरी जर बक्ष यांची दर्गा आहे. या दर्गामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उरुस भरवला जातो. यावर्षी या उरुसाचे 736 वर्षे आहे. कोरोना नंतर दोन वर्षानंतर भरणाऱ्या उरुसाची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी पोलिसांनी तगडा बंदोबस्त या ठिकाणी केला असून यासाठी 46 सीसीटीव्ही फुटेज लावलेले आहेत. ज्यामुळे प्रत्येक हालचाली वरती पोलिसांची नजर असणार आहे. त्यासोबतच आरोग्य यंत्रणा देखील सज्ज करण्यात आलेली आहे. 8 ऑक्टोबरला मिलाद, 9 ऑक्टोबरला ईद-ए- मिलादुन्नबी म्हणजेच मोहंमद पैगंबर यांचे पोशाख व केस दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. हेही वाचा :  हातगाड्यावर सुरूवात झालेला ‘लक्ष्मीनारायण चिवडा’ कसा बनला जागतिक ब्रँड? पाहा Video उरुसाचे महत्त्व इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1400 वर्षांपूर्वीचा पवित्र पोशाख 700 वर्षांपासून खुलताबाद येथे हजरत ख्वाजा सय्यद जैनोद्दीन शिराजी दर्गा मध्ये जतन करून ठेवण्यात आलेला आहे. जगभरातील मुस्लिम बांधवांचा पवित्र मिलाद ईद-ए-मिलादुन्नबी व हजरत मोहम्मद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यामुळे खुलताबाद येथील दर्गांमध्ये मोठ्या भक्ती भावाने सर्वधर्मीय भाविक सहभागी होत असतात. यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून विविध कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत असतात. हजरत मोहम्मद पैगंबर यांना अल्लाहने शब- ए- मेहराजच्या रात्री भेट दिलेला पवित्र पोशाख चांदीच्या पेटीतून बाहेर काढून मखमली आच्छादनावर दर्शनासाठी ठेवला जातो असे सांगितले जाते. दोन वर्षाच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा उरुस मोठ्या उत्साहात भरवला गेला आहे. भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे खुलताबादमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे, अशी माहिती दर्गा अध्यक्ष मोहम्मद अजाज यांनी दिली आहे. हेही वाचा :  मानवतेचा धर्म : गरजूंना मोफत अन्नदान करणारे नाशिकचे योगेश कापसे पाहा Video मी पैठणी दिला आहे लग्नानंतर मला तीन मुली झाल्या. मी दर्गामध्ये मला मुलगा व्हावा यासाठी नवस केला होता. आज तो नवस पूर्ण झाला आहे. यामुळे 12 किलो खाज्या  आम्ही मोजला आहे, अशी प्रतिकिया भाविक गणेश मोटे यांनी दिली आहे. गुगल मॅपवरून साभार  पत्ता औरंगाबाद शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर खुलताबाद आहे. येथे हजरत ख्वाजा मुन्तजबद्दीन जर जरी जर बक्ष यांची दर्गा आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात