मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मानवतेचा धर्म : गरजूंना मोफत अन्नदान करणारे नाशिकचे योगेश कापसे पाहा Video

मानवतेचा धर्म : गरजूंना मोफत अन्नदान करणारे नाशिकचे योगेश कापसे पाहा Video

X
नाशिकचे

नाशिकचे योगेश कापसे गरजू, निराधार आणि बेवारस अशा लोकांना अन्नदाना मार्फत मदत करत आहेत.

नाशिकचे योगेश कापसे गरजू, निराधार आणि बेवारस अशा लोकांना अन्नदाना मार्फत मदत करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

    नाशिक 07 ऑक्टोबर : अन्नदान हाच मानवतेचा धर्म समजून नाशिकचे योगेश कापसे गरजू, निराधार आणि बेवारस अशा लोकांना मदत करत आहेत. कोरोना काळापासूनच त्यांनी ही सुरुवात केलेली आहे. नाशिक शहरात कुठेही जेवणा अभावी उपाशी पोटी कोणी झोपणारा आहे असं समजताच ते त्या व्यक्तीपर्यंत मोफत जेवणाचा डब्बा पोहचवण्याचे काम करतात. 

    योगेश कापसे हे सरकारी दवाखाना असेल किंवा बस स्थानकावर राहणारे गरजू, निराधार आणि बेवारस अशा व्यक्ती असतील यांना ते जेवणाचा डब्बा पोहचवण्याचे काम करतात. त्यांच्या या समाजसेवेत त्यांच्या घरच्या परिवाराचा देखील हात आहे. योगेश कापसे स्वतः घरगुती जेवणाची मेस ही चालवतात. फक्त अन्नदानच नव्हे तर कोणत्याही मदतीला ते निम्म्या रात्री धावून जातात.

    हेही वाचा :  Pune: न बोलताच मिळेल ऑर्डर! पुण्यातील 'या' हॉटेलमध्ये चालते सांकेतिक भाषा, VIDEO

    माणसाने नेहमीच दुसऱ्याला मदत करावी

    आपण ही गरिबीचे चटके खाल्ले आहेत. त्यामुळे आपल्याला ही परिस्थितीची जाणीव आहे. कधी कोणावर वेळ येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे माणसाने नेहमीच दुसऱ्याला मदत करावी. त्यामुळे आम्हाला जशी मागणी होते तसे आम्ही गरजूंना जेवणाचे डब्बे पुरवतो. कधी दहा असतात, कधी पंधरा असतात तर कधी पाच डब्बे ही असतात, असं योगेश कापसे सांगतात. 

    जेवण हवं असल्यास या नंबरवर करा संपर्क 

    नाशिक शहरात ज्यांना जेवणाची गरज आहे अशा गरजू, निराधार आणि बेवारस नागरिकांना 9850490790 या दिलेल्या फोन नंबरवर कोणाच्या ही मार्फत संपर्क केल्यास तुम्हाला जेवणाचा पोहच डब्बा नक्की मिळेल.

    हेही वाचा : Nashik :18 व्या वर्षीच बनली अनाथांची ताई, प्रेरणादायी प्रवास वाचून वाटेल अभिमान! Video

    समाजसेवेला परमेश्वर बळ देवो

    योगेश कापसे गरिबांना अन्नदान करण्याचं काम करतात. अतिशय चांगल त्यांचं हे समाज कार्य आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची ही अविरत सेवा सुरू आहे. त्यांच्या सोबत मदतीला आम्ही नेहमी असतो. गरिबांना मदत करण्याची खूप गरज आहे. आज ही अनेक जण रस्त्यावर बेवारस फिरतात. लक्ष दिलं जातं नाही. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी यावेळी स्वप्नील घिया यांनी केली.

    First published:
    top videos

      Tags: Food, Nashik