अविनाश कानडजे, प्रतिनिधी
औरंगाबाद, 20 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. औरंगाबादमधून आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारु पिताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाचा खून करण्यात आला आहे. धडापासून शिर वेगळे केलेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
उद्योगनगरी वाळूज औद्योगिक परिसरातील बंद पडलेल्या एका कंपनीत धडा वेगळे शिर असलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी या खूनप्रकरणी पुण्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. अजय निलवर्ण उर्फ देशमुख, असे मृताचे नाव आहे. तर निखिल गरड आणि प्रतिक शिंदे अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.
या तिघांमध्ये दारू पिऊन किरकोळ वाद झाला होता. या किरकोळ वादातून आरोपी निखिल आणि प्रतिक यांनी बंद पडलेल्या कंपनीत नेऊन अजयचे धडापासून शीर वेगळे करत त्याचा खून केला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - बराच वेळ मित्रासोबत फोनवर बोलली, मग ओरडण्याचा आवाज आला अन् कायद्याच्या विद्यार्थिनीचा भयानक शेवट
औरंगाबादेतही 'जामतारा', कॉलसेंटरमध्ये जे सुरू होतं ते पाहून पोलीसही चक्रावले -
औरंगाबादमधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ऑनलाईन ॲपद्वारे आधी ग्राहकांना पैसे द्यायचे आणि त्यानंतर पैसे वसुलीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करायची असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. पैसे दिल्यानंतर पैसे वसुलीचा तगादा लावने, कर्जदाराला शिवीगाळ करणे, धमक्या देणे, सोशल मीडियावर कर्जदारांचे फोटो मार्फ करून आरोपी सोशल मीडियावर व्हायरल करत होते. यामध्ये सर्वाधिक फसवणूक ही उत्तराखंड राज्यातील नागरिकांची करण्यात आली होती. अखेर डेहराडून पोलिसांनी औरंगाबाच्या या कॉलसेंटवर छापा टाकत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news, Murder