अविनाश कानडजे (औरंगाबाद) 19 ऑक्टोबर : औरंगाबाद शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत औरंगाबादमध्ये सामान्य लोकांच्या घरी चोऱ्या व्हायच्या परंतु चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तसेच राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांच्या शहरातील एन-13 मधील चाऊस कॉलनी येथील घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चक्क खासदार यांच्याच घरी चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या घरातून 3 हजार रुपये किमतीची जुनी जर्मनची भांडी चोरीला गेली असल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांच्या औरंगाबाद येथील घरी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. खान यांच्या घरात चोरट्यांनी जुनी जर्मनची भांडी चोरल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. दरम्यान आता खासदारांच्याच घरी चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : कोकणात राडा, भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक, पेट्रोलची बॉटलही फेकली
याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. फौजिया खान यांचे औरंगाबाद शहरातील एन-13 मधील चाऊस कॉलनीमध्ये घर असून, 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजिया खान यांचे कुटुंबीय तहेसीन अहेमद खान (वय 65 वर्षे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार शहरातील एन-13 मधील चाऊस कॉलनीतील फौजिया खान यांच्या घरात रात्री 10 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला.
हे ही वाचा : ‘खिसे कापणारे महाठग’, बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्यावर घणाघाती ‘प्रहार’
घरात प्रवेश केल्यावर घरातील जर्मनची पाच जुनी भांडी ज्यांची किमंत 3 हजारच्या आसपास आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.