अविनाश कानडजे (औरंगाबाद), 15 डिसेंबर : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे औरंगाबाद शहर हादरले आहे. भानामती आणि जादूटोणा करणाऱ्या एका मांत्रिकाने स्वतःच्या बावीस वर्षीय मुलीची निर्घुण हत्या केली आहे. त्याने मुलीचा मृतदेह स्वतःच्याच किचनमध्ये पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज येथील समता कॉलनीत सूर्यकांत शेळके यांचे दुमजली घर आहे. याठिकाणी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. दरम्यान याबाबत पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये भानामती आणि जादूटोणा करणाऱ्या एका मांत्रिकाने स्वतःच्या बावीस वर्षीय मुलीची निर्घुण हत्या केली आहे. त्याने मुलीचा मृतदेह स्वतःच्याच किचनमध्ये पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज येथील समता कॉलनीत सूर्यकांत शेळके यांचे दुमजली घर आहे. दहा खोल्या असलेल्या घराच्या दोन खोल्यांमध्ये काकासाहेब नामदेव भुईगळ हा मांत्रिक पत्नी आणि दोन मुलीसह राहत होता.
हे ही वाचा : चखन्यासासाठी दारुड्यांचा भयंकर कांड; फक्त वाचूनच दारू पिणाऱ्यांचाही होईल संताप
या मांत्रिकाने काही महिन्यापूर्वी स्वतःच्या 22 वर्षीय मुलीची हत्या करून मृतदेह किचन रूम मधील सिलेंडर ठेवण्याच्या जागेवर पुरला होता. हा मांत्रिक फरार असल्याने घरमालकाने दरवाजा तोडला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे तीन महिन्यापूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र या मांत्रिकाने स्वतःच्या मुलीची हत्या का केली हे अजून समजू शकले नाही तर मांत्रिक हा फरार आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
औरंगाबादमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलगी पळून गेल्यानंतर समाजात बदनामी झाल्याने झाडाला गळफास देऊन बाप आणि चुलत्याने मुलीचा खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : विम्याच्या 4 कोटींसाठी अपघाताचा बनाव, ‘बॉडी’ न मिळाल्याने मास्टरमाईंडलाच संपवलं, नाशिकमधील खळबळजनक घटना
ही धक्कादायक घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथील आहे. घरात काहीही न सांगता नातेवाईक असलेल्या मुलासोबत मुलगी तीन दिवस घराबाहेर गेली. समाजात अपमान झाल्याने बाप आणि चुलत्याने झाडाला गळफास देत मुलीने आत्महत्या केल्याचे भासविले. इतकेच नव्हे तर नंतर अंत्यविधी करुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला.