लखनऊ, 14 डिसेंबर : दारू प्यायल्यानंतर नशा चढते आणि या नशेत कोण कधी काय करेल याचा नेम नाही. अशाच दोन तरुणांनी नशेत धक्कादायक कृत्य केलं आहे. त्यांनी क्रूरतेची हद्द पार केली आहे. दारूसोबत त्यांनी चखना म्हणजे चक्क कुत्र्याच्या पिल्लांचे कान आणि शेपटी खाल्ली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील ही भयंकर घटना आहे. या दोन्ही दारूड्या तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आली आहे. गौरक्षा दलच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. भारतीय गौ क्रांती मंचाचे अध्यक्ष सत्यम गौड यांनी सांगितलं की, नवी वस्ती एसडीएम कॉलीनी पितांबरपूर रेल्वे स्टेशनजवळ राहणारे दोन तरुणांनी क्रूर कृत्य केलं आहे. सुरुवातीला त्यांनी कुत्र्यांच्या दोन कुत्र्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना पकडलं. दारूच्या नशेत त्यांनी क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या. पिल्लांची शेपटी आणि कान कापले आणि चखना म्हणून खाल्ले. हे वाचा - काय म्हणावं आता! गोरं करण्यासाठी म्हशीलाही फासलं क्रीम; परिणाम तुम्हीच VIDEO मध्येच पाहा दरम्यान आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत. लवकरात लवकर त्यांना अटक केलं जाणार असल्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
शेपटी आणि कान हा प्राण्यांच्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. बरेच प्राणी यांच्यामार्फतच माणसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. शिवाय त्यांच्या या अवयवात शरीराचे इतर भागही जोडलेले असतात. ज्यामुळे ते कापल्याने त्यांना वेदना होतात किंवा काही समस्या उद्भवतात.