औरंगाबाद, 30 सप्टेंबर : स्वप्न पूर्ण करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर स्वप्न साकार करणे कठीण नाही. याचीच प्रचिती औरंगाबाद शहरातील एका महिलेने करून दिली आहे. त्यांनी स्वतःची पाच आकडी पगाराची नोकरी सोडण्याचं धाडस दाखवलं. त्यानंतर स्वतः मसाला व्यवसाय सुरु करत गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. शहरातील खडकेश्वर भागांमध्ये राहणाऱ्या पल्लवी अनिकेत दलाल असे या यशस्वी उद्योजिकेचे नाव आहे. चला तर त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. औरंगाबाद शहरातील नागेश वाडी भागांमध्ये पल्लवी यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील नोकरी करत होते तर आई गृहिणी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण सरस्वती भुवन महाविद्यालयातून पूर्ण झालं. त्यानंतर सरस्वती भुवन महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. पुढील शिक्षण त्यांनी एमबीए मध्ये पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांना एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर त्यांचं अनिकेत दलाल यांच्याशी लग्न झालं. फायनान्स कंपनीमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून त्या काम बघत होत्या त्यामुळे त्यांना 70 हजार रुपये पगार होता.दोघेही नोकरी करत असल्यामुळे संसार सुरळीत चालला होता.
हेही वाचा : लाईफ@25 : अकरावीत 35 टक्के गुण, शेती कसली, सहा वर्ष अपयश पचवलं, PSI संग्राम मालकर यांची संघर्षगाथा
अशी झाली व्यवसायाला सुरुवात मात्र अचानक त्यांच्यासोबत दुर्घटना घडली आणि त्यांच्या पतीची दृष्टी गेली. पतीच्या सोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे त्यांच्यावर एक मोठं संकट कोसळलं. दरम्यान पतीची नोकरी गेली आणि यामुळे पती घरीच राहू लागले. एकट घरी राहून त्यांच्यामध्ये नकारात्मकता येत असल्यामुळे काहीतरी करायचे त्यांनी ठरवलं. यामुळे पल्लवी यांनी मसाला व्यवसाय घरून सुरू केला. पल्लवी या स्वतःची नोकरी करून घर सांभाळत घरामध्ये मसाला व्यवसाय करत होत्या. मसाला व्यवसाय करत असताना पती तयार मालाची विक्री करत होते. दरम्यान 2019 मध्ये पतीला त्यांची नोकरी पुन्हा मिळाली. एवढ्या संकटात सुरू केलेला व्यवसाय हळूहळू रुळावर येत असल्यामुळे अनिकेत यांनी पत्नी पल्लवी यांना तू नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसाय कर असा सल्ला दिला. दोघांमध्ये झालेल्या चर्चांमध्ये दोघांनी पल्लवी यांना नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पाच आकडी पगाराची एसीत बसून काम करण्याची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय हा थोडासा धाडसी होता. मात्र लहानपणापासूनच व्यवसाय करण्याचं स्वप्न असल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. घरातून सुरू केलेला हा व्यवसाय आता नावारूपाला घरामध्ये कोणतीही व्यवसायिक पार्श्वभूमी नसल्यामुळे स्वतः व्यवसाय करत असताना मसाले तयार करून ती विक्री करावा लागणार होता. यामुळे मार्केटमध्ये असलेल्या लोकांची संवाद कसा साधायचा इथपासून सुरुवात होती. या प्रवासात चांगले- वाईट अनुभव आले मात्र अनेक नागरिकांनी महिला व्यवसाय करत असल्यामुळे मला प्रोत्साहन दिल. अनेक दुकानदारांनी तुमचं ब्रँडेड साहित्य नाही म्हणून नाकारलं मात्र आता ग्राहक मागणी करत असल्यामुळे तेच दुकान चालक मला आता फोन करून मसाल्याची ऑर्डर देतात. घरातून सुरू केलेला हा व्यवसाय आता नावारूपाला आलाय. औरंगाबाद जिल्ह्यासह आणखी दोन जिल्ह्यांमध्ये स्वादम मसाल्याचे विक्री होत आहे.’ असे पल्लवी यांनी सांगितले. हेही वाचा :
Life@25 : खान्देशचे सुपूत्र IAS अधिकारी मनोज महाजन ओडिशात बजावताएत सेवा, तरुणाईला देतात ‘हा’ सल्ला चिकाटी सातत्य असेल तर तुम्हाला नक्की यश मिळतं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजासोबतच कुटुंबीयांचं प्रोत्साहन महत्त्वाचे असते. यासाठी मला पती आई वडील सासू-सासरे यांच्यासह कुटुंबासह नातेवाईकातील सर्वांनीच प्रोत्साहन दिल. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नोकरी करणाऱ्या पेक्षा नोकरी देणाऱ्या होणाऱ्या कडे महिला व तरुणांनी लक्ष दिले पाहिजे. यामध्ये जिद्द चिकाटी सातत्य असेल तर तुम्हाला नक्की यश मिळतं असं स्वादम संचालिका पल्लवी दलाल सांगतात. चटपटीत मसाले खानदेशी खिचडी मसाला, दाल तडका मसाला, मराठवाडा स्पेशल काळा रस्सा मसाला, बैंगन मसाला, गावरान रस्सा मसाला, पुलाव बिर्याणी मसाला, शाही पनीर मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, अंडा करी मसाला इत्यादी प्रकारचे मसाल्याचे पदार्थ त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. असा करा संपर्क मोबाईल क्रमांक: 7776907353
गुगल मॅपवरून साभार