औरंगाबाद, 8 नोव्हेंबर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुप्तधनासाठी तिघांनी एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पीडित व्यक्तीचा एक हात आणि एक पाय निकामी झाला आहे. भगवान खरात असं या पीडित व्यक्तीचं नाव आहे. औरंगाबाद तालुक्यातील बनकीन्होळा गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गुप्तधनाच्या लालसेने तीन व्यक्तींकडून भगवान खरात यांना आधी विवस्त्र करण्यात आलं, त्यानंतर त्यांच्यावर कोंबडे ओवाळून टाकण्यात आले. त्यांना जबर मारहाण करत त्यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी वदो़ड बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
जबर मारहाण
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गुप्त धन काढण्यासाठी 3 जणांनी भगवान खरात यांना आधी दारू पाजली. त्यानंतर ते दारूच्या नशेत असताना त्यांना विवस्त्र करण्यात आलं. विवस्त्र करून जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर कोंबडा ओवाळून टाकरण्यात आला. त्यानंतर त्यांच्या अंगावर ज्वनलशील पदार्थ टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर
जिवंत जाळण्याचा प्रयत्न
मारहाणीत भगवान खरात यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच आरोपींनी ते बेशुद्ध असताना त्यांच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांचा एक पाय आणि एक हात निकामी झाला आहे. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं. खरात यांना उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी भगवान खरात यांच्या आईने आरोपींविरोधात वदोड बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, प्रप्त तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad