Home /News /maharashtra /

'विधान परिषदेत खडसेंना पाडण्याचा प्लॅन', खासदार इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप

'विधान परिषदेत खडसेंना पाडण्याचा प्लॅन', खासदार इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप

एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. पण त्यांचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मतभेद असल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलं होतं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठं विधान केलं आहे

पुढे वाचा ...
औरंगाबाद, 16 जून : विधान परिषदेची निवडणूक चार दिवसांवर येवून ठेपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा एकनाथ खडसे यांचं राजकीय पूनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे. ही निवडणुक 20 जूनला होणार असून 10 जागांसाठी असणार आहे. पण या निवडणुकीत भाजपने पाचवा उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. पण त्यांचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मतभेद असल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलं होतं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठं विधान केलं आहे. "भाजपचा विधान परिषदेत एकनाथ खडसे यांना पाडण्याचा प्लॅन आहे. तसेच भाजपने घोडेबाजारासाठीच पाचवा उमेदवार उभा केला आहे", असा धक्कादायक दावा जलील यांनी केला आहे. "एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजप पूर्ण ताकत लावणार आहे. मला तर हे पण माहितीय की एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देण्यासाठी भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तयार होती", असा धक्कादायक आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. (ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत मोर्चा) विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीत एमआयएमचे दोन मतं देखील महत्त्वाचे आहेत. या निवडणुकीत एमआयएम कोणाला मतदान करेल? याकडे सगळ्याचं लक्ष आहे. या दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत एमआयएमचे दोन मतं काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना दिले जातील. पण उद्या आमची मुंबईत बैठक आहे. त्या बैठकीत आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असं जलील यांनी स्पष्ट केलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे पंकजा यांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक देखील आक्रमक झाले आहेत. या सर्व घडामोडींवर देखील इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी जलील यांनी पंकजा यांना वेगळा स्वतंत्र पक्ष काढण्याचा सल्ला दिला. "भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्ष काढावा. एमआयएम त्यांना मदत करेल", असं आवाहन इम्तियाज यांनी केलं.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या