मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Congress Morcha: ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत मोर्चा

Mumbai Congress Morcha: ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत मोर्चा

मुंबई : ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत मोर्चा

मुंबई : ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत मोर्चा

ईडीच्या कारवाईविरोधात मुंबईत काँग्रेसने निषेध मोर्चा काढला आहे. हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत हा मोर्चा काढला आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 16 जून : मुंबईत काँग्रेस पक्षाकडून एक मोर्चा (Congress Morcha in Mumbai) काढण्यात आला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना (Gandhi family) ईडीकडून चौकशीसाठी पाठवण्यात आलेले समन्स आणि राहुल गांधी यांची तीन दिवसांपासून ईडीकडून सुरू असलेली चौकशी याच्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे. हँगिंग गार्डन ते राजभवन (Raj Bhavan) मोर्चा काढण्यात आला असून मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले,अशोक चव्हाण, भाई जगताप, वर्षा गायकवाड, हुसेन दलवाई, अस्लम शेख मोर्चात सहभागी झाले आहेत. राजभवनाला घेराव घालण्यासाठी निघालेला हा मोर्चा पोलिसांनी रोखला आहे. राजभवन परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला असून बॅरेकेडिंग करुन मोर्चेकरांना रोखलं आहे. द्वेषापोटी गांधी परिवाराला बदनाम करण्यासाठी जे षडयंत्र भाजपने रचलं आहे ते संपवण्यासाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेला टिकवण्यासाठी भाजपच्या हुकूमशाही विरोधात करण्यात येणाऱ्या राजभवन येथे आंदोलन करण्यात येत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींची तीन दिवस ईडीकडून चौकशी नॅशनल हेराल्डमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांची मागील तीन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. बुधवारी (15 जून) सुद्धा सकाळपासून राहुल गांधी यांची चौकशी झाली. त्यानंतर रात्री उशीरा 8.30 वाजेच्या सुमारास त्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सलग तीन दिवस चौकशीनंतर राहुल गांधी यांनी गुरुवारी एक दिवस चौकशीला येता येणार नाही, त्यासाठी मुभा द्यावी अशी विनंती ईडीकडे केली. राहुल गांधी यांची विनंती ईडीने मान्य केली आहे. त्यामुळे गुरुवारी राहुल गांधी यांची चौकशी होणार नाही. मात्र, शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे. काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? 1938 मध्ये काँग्रेसने असोसिएट जर्नल्स लिमिटेडची (AJL)स्थापना केली. असोसिएट जर्नल्स लिमिटेड अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आहे. AJL वर 90 कोटींहून अधिक कर्ज घेतले. 90 कोटी कर्ज फेडण्यासाठी यंग इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना केली. यंग इंडिया लिमिटेडमध्ये राहुल, सोनियांची हिस्सेदारी 38-38% टक्के आहे. एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले. शेअर्सच्या बदल्यात यंग इंडिया एजेएलचं कर्ज फेडणार आहे. देशातील मोक्याच्या जागांवर कमी किमतीत ऑफिससाठी जागा आहे. मुंबई, दिल्ली शहरातील मोक्याच्या जागांचं भाडं AJLला मिळत होतं. या जागांचे मूल्य 2 हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली. 50 लाखांच्या मोबदल्यात यंग इंडिया कंपनी 2 हजार कोटींची मालक झाले. याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधींविरोधात सुब्रह्मण्यम स्वामींचा खटला दाखल केला. गांधी कुटुंबाकडून नॅशनल हेराल्डच्या संपत्तीच्या गैरवापराचा आरोप केला गेला. मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबेस सॅम पित्रोदाही आरोपी आहे. 26 जून 2014 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडून समन्स जारी केला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. 19 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पटियाला कोर्टाकडून सर्व आरोपींना जामीन मिळाला. फेब्रुवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने आरोपींविरोधातील कारवाई रद्द करण्याची याचिका फेटाळली. मे 2019 मध्ये, ईडीने 64 कोटींची मालमत्ता जप्त केली. 1 जून 2022 चौकशीसाठी ईडीने सोनिया, राहुल गांधींना समन्स बजावला. त्यानंतर आता राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे.
First published:

Tags: ED, Mumbai, Rahul gandhi, Young Congress

पुढील बातम्या