जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नवनीत राणांवर कारवाई का नाही? तुम्ही मॅनेज झाले का? कोर्टाने पोलिसांना झापलं

नवनीत राणांवर कारवाई का नाही? तुम्ही मॅनेज झाले का? कोर्टाने पोलिसांना झापलं



खासदार नवनीत राणा यांचं बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज सुनावणी झाली.

खासदार नवनीत राणा यांचं बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज सुनावणी झाली.

खासदार नवनीत राणा यांचं बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज सुनावणी झाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 नोव्हेंबर : अमरावतीच्या खासदार या ना त्या प्रकरणामुळे कायम चर्चेत असतात. अशातच बोगस जात पडताळणी प्रकरणामध्ये नवनीत राणा यांच्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी ‘कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे? पोलीस मॅनेज झाले का?’ असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना झापून काढलं. खासदार नवनीत राणा यांचं बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पोलिसांना खडेबोल सुनावले. (राहुल गांधींना महाराष्ट्राच्या खास खाद्यपदार्थांची मेजवानी, या पदार्थांचा समावेश) तक्रारदार जयंत वंजारी यांनी कोर्टाने नवनीत राणा विरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर पोलीस कारवाई करत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणलं. त्यावर न्यायाधीशांनी पोलीस मॅनेज झाले का? असा सवाल केला. कोर्टाने फटकारल्यानंतर, मुलुंड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी नवनीत राणा प्रकरणात कारवाई साठी वेळ मागितला. मात्र न्यायालयाने नाराजी व्यक्त करत म्हटलं की, न्यायालयाच्या आदेशाचा पालन होताना इथं दिसत नाही. कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे? असं म्हणत पुन्हा एकदा झापून काढले. तसंच, न्यायालयाने पोलिसांनी अधिक वेळ देण्याची केलेली विनंती नाकारली. (‘अजिबात सहन करणार नाही’, संभाजीराजेंपाठोपाठ राष्ट्रवादीचाही महेश मांजरेकरांना इशारा) या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त आणि लोकसभा अध्यक्ष यांना सदर प्रकरणाबाबत पत्र लिहिण्याची पोलिसांना सूचना केली आहे. त्याचबरोबर संबंधित पोलीस उपायुक्त यांना या संदर्भात तातडीने कारवाई अहवाल सादर करण्याचा निर्देश दिले आहे. नवनीत राणा यांच्या प्रकरणात पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात