Home /News /maharashtra /

Aurangabad : चंदनाने माखलेल्या 'या' अगरबत्तीची किंमत ऐकून व्हाल थक्क; सुगंध दरवळतो 300 मीटर, पहा VIDEO

Aurangabad : चंदनाने माखलेल्या 'या' अगरबत्तीची किंमत ऐकून व्हाल थक्क; सुगंध दरवळतो 300 मीटर, पहा VIDEO

अगरबत्ती

अगरबत्ती

शहरातील महावीर सुगंधी मार्टमध्ये (Mahavir Sugandhi Mart) 50 हजार रुपयांच्या अगरबत्तीची एक काडी आली आहे. स्पेशल चंदनाचे तेल वापरलेल्या या अगरबत्तीची किंमत तब्बल 50 हजार रुपये एवढी आहे.

    औरंगाबाद, 1 जुलै : पूजेसाठी जेवढे दिव्याला महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व अगरबत्तीला देखील आहे. यामुळे तुम्ही देखील पूजेच्या वेळी अगरबत्ती (Agarbatti) वापरत असाल. या अगरबत्तीची किंमत 50 रुपयांपासून ज्यास्तीत ज्यास्त 500 रुपये पर्यंत तुम्ही ऐकली असेल. शहरातील महावीर सुगंधी मार्टमध्ये (Mahavir Sugandhi Mart) तब्बल 25 आणि 50 हजार रुपयांच्या अगरबत्तीची एक काडी आली आहे. हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल. मात्र, हे खरं आहे स्पेशल चंदनाचे तेल वापरलेल्या अगरबत्तीची किंमत तब्बल 50 हजार रुपये एवढी आहे. हडको एन-9 परिसरात पार्श्वनाथ चौकात मराठवाड्यातील पहिला अगरबत्तीचा मॉल महावीर सुगंधी मार्ट म्हणून सुरू झाला आहे. महावीर सुगंधी मार्ट मराठवाड्यात अगरबत्ती पुरवण्याचे काम करतो. महावीर सुगंधी मार्टची 1978 मध्ये सुरुवात जुना मोंढा भागात झाली होती. जैन कुटुंबीयांनी ही सूरूवात केली होती. जैन कुटुंबीयांची या व्यवसायातील ही तिसरी पिढी असल्याचं ते सांगतात. गेल्या 30 वर्षांपासून अगरबत्ती व्यवसाय करणाऱ्या या जैन कुटुंबीयांनी ग्राहकांना दर्जेदार अगरबत्ती देऊन मोठा ग्राहक वर्ग जमवला आहे. यामुळे मराठवाड्यातून अनेक भागातून व्यवसायिक त्यांच्याकडून अगरबत्ती खरेदी करण्यासाठी येतात. वाचा : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होताच अ‍ॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना अगरबत्तीचं वैशिष्ट्य "आपल्याला पाच, दहा रुपयांमध्ये चंदनाची अगरबत्ती मिळते अशी जाहिरात बघायला मिळते. मात्र, चंदनाच्या किमती बघून चंदन एवढं स्वस्त मिळत नाही. यामुळे ग्राहकांसाठी चंदनाची अगरबत्ती खरेदी करण्यासाठी कंपनीने 50 हजारांची अगरबत्ती तयार केली आहे. 50 हजार रुपयांच्या अगरबत्तीमध्ये अस्सल चंदन वापरलेले आहे. या अगरबत्तीचे उत्पादन बंगळुरु येथे ओरके फ्रेग्रेनस येथे होते. अगरबत्तीची लांबी व रुंदी आपल्या नियमित वापरातील अगरबत्तीच्या एवढी आहे. या आगरबत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे, 200 ते 300 मीटर पर्यंत या अगरबत्तीचा सुगंध दरवळतो. तसेच तुम्ही मोठा बंगला हॉटेल किंवा मॉलमध्ये लावल्यास दोन ते तीन दिवस अगरबत्तीचा सुगंध तुम्हाला मिळू शकतो. अगरबत्ती खरेदी केल्यानंतर तुम्हाला अस्सल चंदनाची अगरबत्ती असल्याचे प्रमाणपत्र देखील कंपनीच्या वतीने देण्यात येते" असे, अगरबत्ती विक्रते सागर जैन सांगतात. अगरबत्तींचे अनेक प्रकार हाताने तयार केलेल्या नैसर्गिक अगरबत्तींचे अनेक प्रकार आहेत. नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले अष्टगंध, चंदन पावडर, तूपवाती, हळदी-कुंकू, नैसर्गिक धूप, हँडमेड साबण, गुग्गुळ, धूप, ऊद हे प्रकार आहेत. म्हैसूर रोल ऑन (अत्तर), सुगंधित रूम फ्रेशनर, स्टैंडर्ड लक्झरी परफ्यूमस्, ओला-कोरडा धूप, भीमसेनी कापूर, इस्कॉन टेम्पल, नागचंपा अगरबत्ती, पूजा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्हैसूर पॅलेस पुरस्कार प्राप्त जमुना (1933) ही अगरबत्ती याच मॉलमध्ये मिळत आहे. वाचा : महाराष्ट्राच्या विधिमंडळात फॅमिली राज, सासरा सभापती तर जावई होणार अध्यक्ष मॉलचा पत्ता  हडको एन-9 परिसरात पार्श्वनाथ चौकात महावीर सुगंधी मार्ट आहे. अगरबत्तीविषयक माहिती घेण्यासाठी  98348 16637 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.                                                                                                                                                         गुगल मॅपवरून साभार... "देवपूजेसाठी लागणारी अगरबत्ती आम्ही नेहमी किराणाच्या यादीत लिहायचो. दुकानदार त्याच्याकडे असलेली कोणतीही अगरबत्ती पिशवीत टाकून द्यायचा. तीच आम्ही वापरायचो. मात्र, महावीर सुगंधी मार्टमध्ये 3 हजार प्रकारच्या अगरबत्ती उपलब्ध आहेत. यामुळे पर्याय उपलब्ध आहेत हव्या तशा अगरबत्ती घेता येतात. त्यासोबतच 50 हजाराची अगरबत्ती ऐकून आम्ही आश्चर्यचकित झालो होतो. मात्र ती प्रत्यक्षात बघून खूप छान वाटते" असे ग्राहक शोभा खिवांसरा सांगतात.
    First published:

    Tags: Aurangabad, Aurangabad News, Lifestyle

    पुढील बातम्या