Home /News /mumbai /

महाराष्ट्राच्या विधिमंडळात फॅमिली राज, सासरा सभापती तर जावई होणार अध्यक्ष

महाराष्ट्राच्या विधिमंडळात फॅमिली राज, सासरा सभापती तर जावई होणार अध्यक्ष

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अध्यक्ष झाल्यास राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्याचा दुर्मिळ योग घडणार आहे.

    मुंबई, 1 जुलै : नाना पाटोळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या (Vidhan Sabha Speaker) खुर्चीवर कोण बसणार याचा फैसला रविवारी होणार आहे. अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षानं (BJP) मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा आमदार म्हणून पहिल्याच कार्यकाळात अध्यक्ष होण्याची संधी त्यांना चालून आलीय. नार्वेकर अध्यक्ष झाल्यास राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्याचा दुर्मिळ योग घडणार आहे. सासरे सभापती नार्वेकरांचे सासरे रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे विधान परिषदेचे सभापती आहेत. सातारा जिल्ह्यातील निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29 वे वंशज आहेत. ते 1995 साली सर्वप्रथम फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निंबाळकरांनी 22 अपक्षांना एकत्र करत तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठिंबा दिला होता. युती सरकारच्या त्या राजवटीमध्ये निंबाळकर हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर निंबाळकर यांनी त्या पक्षात प्रवेश केला. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये आधी राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्रिपद त्यांनी सांभाळले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने 2010 साली सर्वप्रथम विधान परिषदेवर संधी दिली. सध्य ते विधान परिषदेचे सभापती आहेत. जावई होणार अध्यक्ष विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेल्या नार्वेकरांचा भाजपा हा तिसरा पक्ष आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेकडून झाली. शिवसेनेमध्ये ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जात. शिवसेनेतील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा, मीडियाचा जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर नार्वेकरांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी विधान परिषदेचे आमदार असलेले नार्वेकर 2019 मध्ये पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत. मुख्यमंत्रीपद मिळालं, परंतू आता खरी अग्निपरीक्षा; शिंदे गटात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू कायदेतज्ज्ञ आणि सर्वच पक्षात मित्रत्वाचे असलेले संबंध ही नार्वेकरांची खासियत आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यास ही खासियत नार्वेकरांना कामी येईल. त्याचबरोबर सभागृह चालवण्याचे प्रशिक्षण त्यांना सासरे रामराजे निंबाळकरांकडून घरातूनही मिळणार आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: BJP, NCP, Vidhan parishad maharashtra, Vidhan sabha

    पुढील बातम्या