अविनाश कानडजे, औरंगाबाद 18 सप्टेंबर : औरंगाबाद शहरात बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत धावत्या स्मार्ट सिटी बसला अचानक आग लागली. यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं. ही बस करमाडवरून औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात येत होती. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये दहा ते बारा प्रवासी प्रवास करत होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या काही लोकांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की घटनेत संपूर्ण बसने पेट घेतला आहे. धूराचे लोट लांबपर्यंत जात असल्याचं पाहायला मिळतं. आग इतकी भयंकर होती की यात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.
औरंगाबाद शहरात बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत धावत्या स्मार्ट सिटी बसला अचानक आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही pic.twitter.com/pTt9bCd9iE
— News18Lokmat (@News18lokmat) September 18, 2022
सुदैवाने बसमधील प्रवासी वेळीच बाहेर आल्याने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. बसमधून प्रवासी करणारे सर्व दहा ते बारा प्रवासी सुखरूप असल्याचं सांगितलं जात आहे. Aurangabad : रस्ते अपघातात रोज 3 जणांचा मृत्यू, गाडी चालवताना घ्या ‘ही’ काळजी काही दिवसांपूर्वीच घडलेली अशीच एक घटना - तीन आठवड्यापूर्वी औरंगाबादमधून अशीच आणखी एक घटना समोर आली होती. यात औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर पंधरापेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बसने अचानक पेट घेतला होता. अहमदनगर महामार्गावरील ढोरेगाव फाटा येथे ही घटना घडली होती. मात्र पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने बसमधील बारा ते पंधरा प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं. मात्र त्यानंतर बस जळून पूर्णपणे खाक झाली होती.