औरंगाबाद, 28 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये (shivsena) बंडखोरी करून शिंदेंनी वेगळा गट स्थापन केला आहे. भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आमदार, खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता आणखी दोन आमदार शिंदे गटात (shinde group) प्रवेश करणार आहे, असं सूचक विधान शिंदे गटाचे मंत्री रोहयोमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केलं आहे. शिंदे गटाने शिवसेनेमध्ये बंडखोरी करून 40 आमदार गळाला लावले आहे. पण अजूनही शिवसेनेतून आमदार शिंदे गटाच्या मार्गावर आहे. शिवसेनेचे असलेले दोन आमदार लवकरच शिवसेनेतून बाहेर पडून शिंदेसेनेत येणार आहे, असा दावा रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे. ‘मी शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झालो. मी राज्यमंत्रिपद मागितले होते, पण मला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. मी शिंदेंबरोबर जाताना पद गेले तर काय होईल याचा विचार केला नव्हता. उद्धव ठाकरे आता कुणालाही भेटण्यासाठी तयार आहे. पण अडीच वर्ष त्यांना आम्हाला भेटायला वेळ नव्हता’, अशी टीकाही भुमरे यांनी केली. (Sanjay Rathod : शिंदे गटातील वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्याला कोरोनाची लागण ट्वीट करत दिली माहिती) आदित्य ठाकरे यांची संवाद यात्रा सुरू आहे. पण, त्यांच्या दौऱ्याला जमत असलेली गर्दी ही गारूड्याचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या गर्दीपेक्षा कमी असते, असा टोलाही भुमरे यांनी लगावला. जयंत पाटील, खडसेंनी पाठ फिरवताच शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिंदे गटात दाखल दरम्यान, जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे सुद्धा हजर होते. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पण, या बैठकीनंतर नेत्यांनी पाठ फिरवताच कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची वाट निवडली. (अशा पातळीहीन बैठकीतून मीच बाहेर जातो, तुमचं चालुद्या संभाजीराजे मुख्यमंत्र्यावर चिडले) राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहे. शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास सारोळा, रिगाव येथील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.