जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मृत्यूचं प्रमाणपत्र मिळूनही जिवंत समजून दीड वर्ष मृतदेहासोबत एकाच घरात राहिलं कुटुंब; असा झाला खुलासा

मृत्यूचं प्रमाणपत्र मिळूनही जिवंत समजून दीड वर्ष मृतदेहासोबत एकाच घरात राहिलं कुटुंब; असा झाला खुलासा

फाईल फोटो

फाईल फोटो

एप्रिल 2021 मध्ये त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं आणि त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्रही त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लखनऊ 24 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात कुटुंबीयांनी दीड वर्ष आयकर अधिकाऱ्याचा मृतदेह घरातच ठेवला, विशेष म्हणजे संपूर्ण कुटुंबीय त्याच्यासोबतच झोपत होते. आयकर अधिकारी कोमात असल्याचं कुटुंबीयांनी लोकांना सांगितलं होतं. मात्र, सत्य हे आहे की रुग्णालयाने दीड वर्षांपूर्वी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र जारी केलं होतं. ही बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. मृतदेह दीड वर्षापासून घरात असल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह आरोग्य विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं की, मृतदेह ममीसारखा बनवून कपड्यात घट्ट गुंडाळलेला होता. लग्नाला 10 वर्ष होऊनही मूल झालं नाही; साताऱ्यातील दाम्प्त्याने उचललं धक्कादायक पाऊल मिळालेल्या माहितीनुसार, रोशन नगर येथील रहिवासी विमलेश कुमार इन्कम टॅक्समध्ये काम करत होते. एप्रिल 2021 मध्ये त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं आणि त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्रही त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलं. मृतदेह घरी आणल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. यादरम्यान, मृतक शुद्धीवर आल्याचं सांगून अचानक अंतिम संस्कार पुढे ढकलण्यात आले. यानंतर मयताचा मृतदेह सुमारे दीड वर्ष घरातील बेडवर ठेवण्यात आला होता. विमलेश कोमात असल्याचं कुटुंबीय लोकांना सांगत राहिले. पण, एका दिवसापूर्वी आयकर विभागाने कानपूरच्या सीएमओ कार्यालयाला चौकशीसाठी पत्र पाठवल्यानंतर शुक्रवारी संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. चोर नग्न अवस्थेत अंगाला तेल लावून रस्त्यावर फिरायचा, मुंबई पोलिसांनी ठेचल्या नांग्या ही बाब आजूबाजूच्या लोकांना कळताच एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाचं पथक आझमगड पोलीस ठाण्याच्या प्रमुखांसह घरी पोहोचलं. मात्र, कुटुंबीयांनी त्याला मृतदेह म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि तो जिवंत असल्याच्या मतावर ते ठाम राहिले. यानंतर वैद्यकीय पथकाने दीड वर्षांपूर्वीचा मृतदेह तपासणीसाठी हॅलेट रुग्णालयात पाठवला. यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. मृताचे वडील म्हणाले, ‘एप्रिल 2021 मध्ये मुलगा आजारी होता, म्हणून आम्ही त्याला रुग्णालयात नेलं. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. पण, जेव्हा आम्ही त्याला घरी आणलं तेव्हा आम्ही पाहिलं की त्याच्या नाडीचे आणि हृदयाचे ठोके सुरू होते, त्यामुळे आम्ही त्याचे अंतिम संस्कार केले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात