मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /SSC-HSC Exam : विद्यार्थ्यांनो, टेन्शन आलंय? 'या' पद्धतीनं सोडवा बिनधास्त पेपर! Video

SSC-HSC Exam : विद्यार्थ्यांनो, टेन्शन आलंय? 'या' पद्धतीनं सोडवा बिनधास्त पेपर! Video

X
SSC-HSC

SSC-HSC Exam : परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना दडपण येत असतं. दडपण न घेता पेपर कसा सोडवावा जाणून घ्या.

SSC-HSC Exam : परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना दडपण येत असतं. दडपण न घेता पेपर कसा सोडवावा जाणून घ्या.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Aurangabad, India

  सुशील राऊत, प्रतिनिधी

  औरंगाबाद, 21 फेब्रुवारी : बारावीच्या परीक्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. तर दहावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांनी सुरू होणार आहेत.  त्यामुळे मुलांमध्ये तसंच पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. परीक्षेच्या पेपरची अनेकांना भीती असते. परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना दडपण येत असतं. त्यामुळे परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांनी दडपण न घेता पेपर कसा सोडवावा? काय काळजी घ्यावी ज्यामुळे मानसिक संतुलन बिघडणार नाही याबाबतची माहिती मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांनी दिली आहे.

  कोणत्या गोष्टी कराव्यात?

  परीक्षा देत असताना मला काहीच आठवत नाही असं होऊ शकतं. यावेळी दीर्घ श्वास घ्या त्यानंतर तुम्हाला सर्व काही आठवायला लागू शकतं.

  मला काही आठवतच नाही असा मॅसेज तुमचा मेंदू तुम्हाला देऊ शकतो मात्र तसं होणार नाही. तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास तुम्हाला आठवेल. यामुळे तुम्हाला परीक्षा सहज देता येऊ शकेल.

  परीक्षेच्या दरम्यान अभ्यासक्रमाच्या बाहेरचं काही येईल असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र, अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. परीक्षा देताना आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी.

  परीक्षा देत असताना मला किती मार्क पडतील हा विचार करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक परीक्षेच्या पूर्वी त्या त्या विषयाचा अभ्यास करणे यालाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.

  परीक्षेच्या कालावधीमध्ये संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमचा आरोग्य चांगलं राहू शकतं. सोबतच नियमित वेळेवर झोप असणे आवश्यक आहे.

  HSC Exam: कॉपी बहाद्दरांना चाप, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

  परीक्षेच्या कालावधीमध्ये टीव्ही बघणे अति वेळ मोबाईल बघणे हे टाळावं. त्यासोबतच नवीन चित्रपट किंवा मालिका बघणे हे देखील टाळावं.

  परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी शांततेने विचार करावा. संतुलित आहार योग्य झोप मोबाईल टीव्ही कमी वापर केल्यानंतर त्यांना परीक्षा दरम्यान ताणतणाव येणार नाही. वर सांगितलेल्या टिप्स प्रमाणे नियोजन केलं तर तणावमुक्त परिस्थितीमध्ये परीक्षा देता येईल, असं संदीप सिसोदे यांनी सांगितलं.

  First published:
  top videos

   Tags: Aurangabad, Career, HSC Exam, Local18, Ssc board