औरंगाबाद, 28 मे: राज्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने हात पाय पसरले आहेत. सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाबाधितांच्या एकूण बळींची संख्या 64 वर पोहोचली आहे. 2 महिन्यांत शहरातील सर्वाधिक 6 जणांचे एकाच दिवशी मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर औरंगाबाद शहर व जिल्ह्यात बुधवारी 32 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1362 झाली. बुधवारी ५६ जणांना डिस्चार्ज मिळाला. हेही वाचा.. ‘बर्थ डे’चं अनोखं ‘गिफ्ट’! 14 वर्षीय मुलगी वाढदिवशीच झाली कोरोनामुक्त… घाटी हॉस्पिटलमध्ये इंदिरा नगरातील 56 वर्षीय पुरुष, हुसेन कॉलनीतील 38 वर्षीय पुरुष आणि रहीमनगर येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मकसूद कॉलनीतील 65 वर्षीय पुरुष, गारखेडा परिसरातील 76 वर्षीय महिला व रोशनगेट येथील 64 वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शहरात 10 दिवसांत बळींची संख्या दुपटीवर औरंगाबादेत 5 एप्रिलला कोरोनाचा पहिला बळी गेला. 17 मे रोजी अवघ्या साडेतेरा तासांत 5 रुग्णांचे मृत्यू झाले होते, तेव्हा एकूण बळींची संख्या 31 होती. मात्र, त्यानंतर दहाच दिवसांत बळींची संख्या दुपटीने म्हणजे 64 पर्यंत वाढली. 25 मे रोजीही 5 जणांचे बळी गेले होते. दिवसभरात 105 जणांचा मृत्यू राज्यात बुधवारी एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले. 105 मृत्यूंसह मृतांची एकूण संख्या 1897 वर गेली आहे. 2190 नव्या रुग्णांसह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा रुग्णांची एकूण 56,948 वर गेला. राज्यात 964 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले असून बरे होणाऱ्यांची संख्या 17,918 झाली आहे. राज्यात 37,125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे, मुंबईत दिवसभरात 1002 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही 32 हजार 974 वर पोहोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1065 वर पोहोचली आहे. हेही वाचा.. पोलीस दलालाही कोरोनाचा विळखा; पुन्हा एक महिला IPS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.