पोलीस दलालाही कोरोनाचा विळखा; पुन्हा एक महिला IPS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

पोलीस दलालाही कोरोनाचा विळखा; पुन्हा एक महिला IPS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

देशातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनामुळे 12 हून अधिक पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नई दिल्ली, 27 मे : दिल्ली पोलीस दलात कार्यरत असलेली महिला IPS अधिकारी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. तपासणीनंतर अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर आता या महिला DCP अधिकाऱ्यांसह त्यांच्यासोबतच्या ३ पोलिसांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापूर्वी शहादरा जिल्ह्यातही एडिशनल डीसीपी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. कोरोना व्हायरसचा प्रभाव दिल्ली पोलीस दलातही वाढत असून, पोलीस शिपाई अमित राणा यांचा कोरोनामुळे काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे.

पोलीस दलात कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागणारं दिल्ली हे महाराष्ट्रानंतरचे दुसरे राज्य आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनामुळे 12 हून अधिक पोलिसांचा मृत्यू झाला आहे, दिल्लीत मात्र आत्तापर्यंत एकाच पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीतील 100 हून अधिक पोलीस हे कोरोनाशी यशस्वी लढा देऊन त्यांच्या घरी परतले आहेत.

दिल्ली पोलीस दलाला कोरोनाचा धोका

कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या दिल्ली पोलीस दलातील बऱ्याच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात दोन आयपीएस अधिकारी, 2 वरिष्ठ अधिकारी आणि 450 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उत्तम नगर, नॉर्थ एवेन्यू, फर्श बाजार, जामिया नगर, लाजपत नगर आणि नंद नगरी या भागातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर काही जणांनी उपचार घेतले आणि ते पुन्हा कामावरही रुजू झाले आहेत. या युद्धात दिल्ली पोलीस दलातील कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.

दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजारांच्या पार

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, दिल्लीतही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. बुधवारपर्यंत दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 257 पर्यंत पोहचली आहे. यातील 7690 जणांवर उपचार सुरु असून, 7264 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे दिल्लीत 303 जणांनी आपला प्राण गमावला आहे.

हे वाचा -खासगी डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची नजर; कामावर रुजू न झाल्यास घेणार अ‍ॅक्शन

First published: May 27, 2020, 11:14 PM IST

ताज्या बातम्या