Home /News /maharashtra /

पतीशी भांडण करुन घराबाहेर पडलेली महिला सापडली 'कोरोना'च्या तावडीत!

पतीशी भांडण करुन घराबाहेर पडलेली महिला सापडली 'कोरोना'च्या तावडीत!

कोरोनाबाधित महिला जालना तालुक्यातील गुंडेवाडी गावात पतीसह राहत होती.

जालना, 17 एप्रिल: पतीशी भांडण करुन जालन्याहून गुजरातमध्ये जाणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. गुजरातमध्ये ती आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही घटना समजताच जिल्हा प्रशासनासह जालनेकरांमध्ये धडकी भरली आहे. गुजरात राज्यातील नर्मदा येथील पोलिस अधीक्षकांनी एका पत्राद्वारे जालना पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांना ही माहिती कळवली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सदर कोरोनाग्रस्त महिलेची पती व तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. हेही वाचा...21 एप्रिलपासून संचारबंदी शिथिल होणार, या कर्मचाऱ्यांना मिळणार एसटीची विशेष सेवा याबाबत मिळालेली माहिती अशी की, संबंधित महिला जालना तालुक्यातील गुंडेवाडी गावात पतीसह राहत होती. हे दोघे दाम्पत्य गावातीलच एका कंपनीत काम करत होते. दरम्यान, पतीसोबत भांडण झाल्याने सदर महिला 10 एप्रिल रोजी गुजरातमधील देदीपाडा जिल्ह्यातील भुतबेडा गावी गेली होती. त्याठिकाणी तिचा स्वॅब घेऊन कोरोना टेस्ट करण्यात आली. दरम्यान,15 एप्रिल रोजी तिचा वैद्यकीय अहवाल आला. त्यात तिला कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झालं. तेथील जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जालना येथील जिल्हा पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांना पत्राद्वारे माहिती दिली. त्यानंतर एस.चैतन्य यांनी या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांना दिली. हेही वाचा..परभणीत खळबळ! लॉकडाऊनमध्ये 370 किमी प्रवास करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांच्यासह चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले आणि इतर सहकारी अधिकारी व कर्मचारी गुंडेवाडी येथे दाखल झाले. सदर महिलेच्या पतीसह संपर्कात आलेल्या 14 जणांचा प्रशासनाकडून शोध घेण्यात आला असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी घेण्याचं काम सुरु आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या