मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ऐन लक्ष्मीपूजनाच्या आधी ST बसचालकाने स्थानकात विष केले प्राशन, बीडमधील धक्कादायक घटना

ऐन लक्ष्मीपूजनाच्या आधी ST बसचालकाने स्थानकात विष केले प्राशन, बीडमधील धक्कादायक घटना

बसवरील सीटवर बसले असताना अचानक त्याना आकडी आली व  ते बेशुद्ध झाले.

बसवरील सीटवर बसले असताना अचानक त्याना आकडी आली व ते बेशुद्ध झाले.

नागरिकांनी प्रसंगावधान राखत चालकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

बीड, 04 नोव्हेंबर : एसटी महामंडळ (maharashtra st bus) राज्य सरकारमध्ये (mva government) विलीन करून घेण्यासाठी एकीकडे कर्मचाऱ्यांचं आंदोलन ( ST bus workers strike) सुरू आहे. तर दुसरीकडे बसस्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) केल्याची खळबळजनक घटना आज दिवाळीच्या दिवळी बीडमध्ये घडली आहे. नागरिकांनी प्रसंगावधान राखत चालकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

बीड जिल्ह्यात कडा बस स्थानकावर ही घटना उघडकीस आली. बाळू महादेव कदम (वय 35) असे चालकाचे नाव आहे. तो आष्टी येथील रहिवासी आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

आष्टी येथील बाळू महादेव कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. आज दुपारी आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस ( MH 20,BL 2086 ) घेऊन ते निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले.

लग्नाच्या 4 दिवसांनंतर बॅगेत आढळला नवरीचा मृतदेह, दुसऱ्या लग्नानंतर झाला घात

चालक कदम यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच वाहतूक नियंत्रक आलिशा बागवान, मुन्ना रावल, सुरेश खंदारे आणि वाहक यांनी त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांनी विषारी द्रव्य प्राशन का केले याचे कारण अस्पष्ट आहे. बस कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी बीड आगारांमध्ये कामबंद आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या घडलेल्या प्रकारामुळे एसटी कामगारांचे प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. एसटी राज्य शासनात विलीन करा या मागणीसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने नोटीस बजावली आहे. एसटी कर्मचारी जगला तर एसटी जगेल यांचे भान आपण ठेवाल आणि कारवाई न करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांना द्याल असे मला वाटते, अशी विनंती राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

तसंच, "एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल." असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

First published: