मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लग्नाच्या 4 दिवसांनंतर सूटकेसमध्ये आढळला नवरीचा मृतदेह, दुसऱ्या लग्नानंतर झाला घात

लग्नाच्या 4 दिवसांनंतर सूटकेसमध्ये आढळला नवरीचा मृतदेह, दुसऱ्या लग्नानंतर झाला घात

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

या जोडप्याचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. लग्नात तर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

  • Published by:  Meenal Gangurde

ब्रिटेन, 4 नोव्हेंबर : भारतच नाही तर जगभरातील लग्नासंदर्भातील (Marriage) अनेक विचित्र गोष्टी समोर येत असतात. काही घटना विनोदी असतात तर काही मात्र गंभीर असतात. अशीच एक घटना ब्रिटेनमधून समोर आली आहे. येथे लग्नाच्या चार दिवसांनंतर नवरीचा मृतदेह तिच्याच बॅगेत आढळून आला, यानंतर खळबळ उडाली. सध्या या प्रकरणात नवरदेवाला अटक करण्यात आली आहे. (The body of the bride was found in the bag 4 days after the wedding)

ही घटना ब्रिटेनमधील एका शहरातील आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, एक दाम्पत्य बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये होतं. त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी नुकतच नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. लग्नात दोघेही खूप आनंदी दिसत होते. सर्व पाहुणे मंडळीदेखील आनंदात होते. मात्र लग्नाच्या चार दिवसांनंतर भयावह घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या चार दिवसांनंतर महिलेचा मृतदेह एका मैदानात सापडला. तिचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला होता. प्राथमिक तपासानुसार तरुणीचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून मैदानात ठेवण्यात आला.

हे ही वाचा-मृत्यूच्या 1 तासआधी आईशी शेवटचं बोलली; ऐन दिवाळीत विवाहितेनं उचललं भयावह पाऊल

दाम्पत्याने 2020 जानेवारीत साखरपुडा केला होता आणि महिलेच्या मृत्यूच्या चार दिवसांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. महिलेचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या लग्नानंतर तिला दोन मुलं होती. लग्नात आलेल्या तिच्या एका जवळील मित्राने सांगितलं की, ते दोघे एकमेकांवर प्रेम करीत होते. विश्वास बसत नाही, की नेमकं असं काय घडलं. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. त्यानेही पत्नीची हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Marriage