जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नळावर पाणी भरू दिले नाही म्हणून तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला, साताऱ्यातला LIVE VIDEO

नळावर पाणी भरू दिले नाही म्हणून तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला, साताऱ्यातला LIVE VIDEO

साताऱ्यातील कलेढोन इथं ही घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

साताऱ्यातील कलेढोन इथं ही घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

साताऱ्यातील कलेढोन इथं ही घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

  • -MIN READ
  • Last Updated :

सातारा, 24 जुलै : नळावर पाणी भरण्यावरून वाद नवा नाही. पण, याच वादावरून शेजारी राहणारे दोन कुटुंब एकमेकांच्या जीवावर उठले होते. नळावर पाणी भरू नाही दिले म्हणून दोन कुटुंबांमध्ये तलवार आणि कुऱ्हाडीने मारामारी झाल्याची घटना साताऱ्यात (satara) घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कलेढोन इथं ही घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेला नळावर पाणी भरुन दिले नाही म्हणून दोन कुटुंबात झालेल्या वादावादीनंतर तलवार कुऱ्हाड या सारख्या धारदार शस्त्र घेऊन एकमेकांवर हल्ला करण्यात आला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या व्हिडीओमध्ये काही जणांच्या हातात तलवारी तर काहींच्या हातात कुऱ्हाडी दिसत आहे. एकमेकांवर तलवारी आणि कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या मारामारीत काही जण जखमी झाले आहेत. तर यातील एकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( रेल्वे पुलावर जाऊन बसली आणि नंतर मारली समुद्रात उडी, थरकाप उडवणारा VIDEO ) वडूज पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी यातील फक्त एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात