मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोकणात रिफायनरी प्रकल्प आल्यास...उद्योगमंत्री होताच उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

कोकणात रिफायनरी प्रकल्प आल्यास...उद्योगमंत्री होताच उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज खातेवाटपाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणाऱ्या उदय सामंत (Uday Samant) यांना या सरकारमध्ये उद्योगमंत्री पद देण्यात आलं आहे.

    रत्नागिरी, 14 ऑगस्ट : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज खातेवाटपाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणाऱ्या उदय सामंत (Uday Samant) यांना या सरकारमध्ये उद्योगमंत्री पद देण्यात आलं आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रश्न विचारण्यात आला. रिफायनरी प्रकल्प आल्यास संपूर्ण कोकणाचा कायापालट होईल. स्थानिक लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून काम सुरू करण्यात येईल, असं उदय सामंत म्हणाले. महाराष्ट्रासह कोकणातील बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना तसंच कोकणातल्या स्थानिकांनी विरोध केला होता. या प्रकल्पामुळे कोकणात मोठा वाद निर्माण झाला होता. खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तार आणि आमदारांच्या नाराजीवरही उदय सामंत यांनी भाष्य केलं. पन्नास जणांना मंत्रिपद देणं हा समज चुकीचा आहे. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये सामंजस्य असून अधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेरिट बघून पुढचा विस्तार करतील, असं सामंत म्हणाले. गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. कोरोनानंतर कोकणात येणाऱ्या भाविकांमध्ये दीड पट वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव काळात भक्तांना कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचं सामंत यांनी सांगितलं. परशुराम घाटाची पाहणी करताना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 15 दिवसांच्या आत आवश्यक उपाययोजना करून घाट वाहतुकीसाठी सुरळीत करावा, असे आदेश उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या