मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वा रे पठ्ठ्या! Youtube वर व्हिडिओ पाहून ATM मशीन फोडत होता उच्चशिक्षित तरुण!

वा रे पठ्ठ्या! Youtube वर व्हिडिओ पाहून ATM मशीन फोडत होता उच्चशिक्षित तरुण!

आरोपी उच्च शिक्षित असून तो टेक्नो सॅवी देखील आहे. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुनित सहज हाताळतो.

आरोपी उच्च शिक्षित असून तो टेक्नो सॅवी देखील आहे. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुनित सहज हाताळतो.

आरोपी उच्च शिक्षित असून तो टेक्नो सॅवी देखील आहे. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुनित सहज हाताळतो.

मुंबई, 27 ऑक्टोबर: गेल्या आठवड्या मुलुंडमध्ये गॅस कटरच्या मदतीनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. तसाच प्रकार आता पश्चिम उपनगरात असलेल्या बोरिवली (पूर्व) या ठिकाणी झाला आहे. पहाटे गॅस कटरच्या मदतीनं इंडिकॅश हे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न एक चोरटा करत होता. विशेष म्हणजे Youtubeवर व्हिडिओ पाहून हा बहाद्दर ATM मशीन फोडत होता. याची कुणकुण लागताच मुंबई पोलिसांनी चोरट्याला रंगेहाथ अटक केली. हेही वाचा...Go Corona Goची घोषणा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना झाला कोरोना मिळालेली माहिती अशी की, पुनित राणा असं आरोपीचं नाव आहे. आरोपी उच्च शिक्षित असून तो टेक्नो सॅवी देखील आहे. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुनित सहज हाताळतो. यातूनच त्याला चोरीची, एटीएम फोडण्याची कल्पना सुचली. विशेष म्हणजे तो चोरी करण्यापूर्वी सोशल मीडियाची मदत घेत होता. Youtubeवर चोरीचे व्हिडिओ पाहात होता. गॅस कटरच्या मदतीनं एटीएम फोडून पैसे कसे लुटायचे या करता पुनित सतत सोशल मीडियावर व्हिडिओ पाहात होता. हे व्हिडिओ पाहूनच पुनितने मुंबईतील बोरीवली भागात एटीएम चोरीचा कट आखला होता. दसऱ्याच्या दिवशी पहाटे तो गॅस कटर आणि इतर साहित्य घेवून एटीएम चोरी करायला गेला होता. एटीएम मशीन त्याने फोडली पण त्यातील पैसे मात्र तो चोरु शकला नाही. कारण फोडलेल्या एटीएममधील पैसे घेवून पळण्याआधीच समता नगर पोलिसांनी पुनितच्या मुसक्या आवळल्या. असा लागला चोरीचा सुगावा... पुनित एटीएम फोडत असताना होत असलेला आवाज एटीएम बाहेरुन गस्त घालत असणाऱ्या पोलिसांना आला. त्या पोलिसांनी नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यास एटीएमजवळ जातात पुनित हा कटरनं एटीएम कापत होता. पोलिसांनी पुनितला रंगेहाथ पकडले. असाच एक एटीएम फोडण्याचा प्रकार मुलूंड भागातही घडला होता तो प्रयत्न देखील पुनितने केला असावा, असा संशय मुंबई पोलिसांना आहे. याबाबत पोलिस आता कसून चौकशी करत आहेत. हेही वाचा...महाविकास आघाडीत 12 जागांसाठी चुरस? उद्या कॅबिनेटची महत्त्वाची बैठक दरम्यान, एटीएम फोडण्यासाठी पुनितने सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून मुंबईतील विविध विभागातून गॅस कटर, गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर विकत घेतलं होतं, अशी माहिती समता नगर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजू कसबे यांनी दिली आहे.
First published:

Tags: Crime, Maharashtra, Mumbai police

पुढील बातम्या