बीड, 30 ऑक्टोबर : मराठवाड्यात झालेल्या (marathawada rain) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतनिधीवरून महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि भाजपमध्ये (bjp) आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. तर ‘बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे एकही पथक का आणले नाही’, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांना केला आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी बीडच्या अतिवृष्टीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. विरोधकांनी आमच्यावर टीका केली होती की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा निधी हवेत आहे का? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सवाल उपस्थित केला होता. यावर प्रतिउत्तर देत धनंजय मुंडे म्हणालेत की, ‘आज मी त्या लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की त्यांनी केंद्राचे एकही पथक सुद्धा पाहणीसाठी आणले नाही. 502 कोटींचा निधी आम्ही एकट्या बीड जिल्ह्यासाठी मजूर करून आणला व आज जवळपास 15% टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा झाली आहे. महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचे सरकार आहे’ असा पलटवार मुंडेंनी केला. जिंकण्यासाठी चढाओढ! रेस सोडून घोड्यांची रंगली WWF; पाहा जबरदस्त फायटिंगचा VIDEO तसंच, ‘आज मी त्या लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की त्यांनी केंद्राचे एकही पथक सुद्धा पाहणीसाठी आणले नाही’ असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टोला लगावला. जिंकण्यासाठी चढाओढ! रेस सोडून घोड्यांची रंगली WWF; पाहा जबरदस्त फायटिंगचा VIDEO तसंच,यावेळी धनंजय मुंडेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला.‘भाजपच्या नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की तुम्ही आम्हाला खिश्यात ठेवतील. तुम्ही ज्यांनी त्यांनी आपली आपली ठेऊन बोलायला पाहिजे. तुम्ही याठिकाणी कुणाला खिश्यात ठेवतो, कुणाला वाचपाकिटामध्ये ठेवतो, ही भाषा चंद्रकांत दादा पाटील यांच्या सारख्या भारतीय जनता पार्टीच्या राज्य अध्यक्षाला शोभणारे नाही’ असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.