मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विधानसभा अध्यक्ष निवडणूक: राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; पत्रात नमूद केलं की...

विधानसभा अध्यक्ष निवडणूक: राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; पत्रात नमूद केलं की...

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबई, 27 डिसेंबर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. काल महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी राज्यपालांना विधानसभाअध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यासंदर्भात निवेदन पत्र देऊन सूचित केलं. मात्र राज्यपालांनी अभ्यास करण्यासाठी वेळ मागून घेतला.

मला राज्यघटनेच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची कायदेशीर प्रक्रिया तपासायची आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात इतकंच नमूद केलं आहे. किती वेळ हवा आहे किंवा किती काळ लागू शकेल अशी कोणतीच माहिती या पत्रात नसल्याचं समजतंय.

हेही वाचा-  शाळा-कॉलेज सुरु राहणार?; आदित्य ठाकरे म्हणाले, ''पुढच्या आठवड्यात...''

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ( Assembly Speaker (Election) निमित्ताने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन संपायला(Maharashtra Vidhimandal Session) अवघे दोन दिवस उरले आहेत. मात्र तरीही विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेच अद्याप कायम आहे. महाविकास आघाडीच्या (mva government) शिष्टमंडळाने काल राजभवनावर जाऊन राज्यपालांची (governor bhagat singh koshyari) भेट घेतली.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली असून सही करण्याची विनंती केली आहे. पण, राज्यपालांनी थोडा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनाची पायरी चढली आहे.

हेही वाचा-  ''...राष्ट्रपती राजवट लागू शकते'', चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

काल महाविकास आघाडीचे नेते शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात राज्यपालांनी चर्चा केली.

First published:

Tags: Governor bhagat singh, Uddhav Thackeray (Politician)