भिवंडी, 28 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन पुकारले होते. त्यामुळे राज्यभरात हा मशिदींवरील भोंग्याचा विषय चर्चेत आला होता. तर दुसरीकडे, एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांची भिवंडीत सभा पार पडली. यावेळी अजान सुरू झाली असता ओवेसींनी सभा थांबवून कार्यकर्त्यांसह व्यासपीठासमोरच नमाज अदा केली.
असाउद्दीन ओवेसी यांची भिवंडीतील परशुराम टॉवर मैदानात जाहीर सभा पार पडली. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारीस पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते. औवेसी जेव्हा व्यासपीठावर पोहोचले होते, त्यावेळी संध्याकाळच्या नमाजचा वेळ झाला होता. अजान सुरू होणार होती. त्याआधी औवेसी यांनी आपलं भाषण थांबवलं.
त्यानंतर व्यासपीठासमोरच चादर टाकण्यात आली आणि ओवेसी यांनी आपल्या सर्व नेत्यांसह नमाज अदा केली. यावेळी स्पीकरवरून अजान देण्यात आली होती. त्यानंतर भाषणाला सुरुवात केली. यावेळी ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मोदी सरकावर जोरदार टीका केली.
दिल्लीच्या ईडीमुळे जशी स्थिती होती आहे याची जाणीव सरकारला होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खालिद गुड्डू ला सोडण्यासाठी प्रयत्न करावे. खालिद गुड्डू बाहेर आल्यास आणखी ताकदवर होईल. राष्ट्रवादी आणि टोरंट वीज कंपनीच्या विरोधात भूमिका घेतल्याने खालिद गुड्डू ला जेलमध्ये पाठवले त्यांच्या सहकाऱ्यांना देखील पोलिसांनी अटक केली.
(Aryan Khan नंतर रिया चक्रवर्ती ड्रग केसचा फेरतपास करा : अॅड. सतिश मानेशिंदे)
नवाब मलिक यांचा विषय घेणार नाही, ही बला आमच्याकडे नको. पण शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटतात आणि सांगतात संजय राऊत यांना वाचवा मात्र मुस्लिम नवाब मलिक यांना जेलमध्ये टाकले. आता नवाब मलिक यांना संजय राऊत प्रमाणे न्याय देणार का, असा सवालही ओवेसींनी राष्ट्रवादीला केला.
(जर अशी लक्षणं दिसत नसतील तर नॉर्मल नाहीये तुमची मासिक पाळी!)
पेट्रोल-डिझेल महाग झाला तर औरंगजेब जबाबदार, मोदी सरकार नाही. भारत कुणाचा आहे तर द्रविड आदिवासी यांचा आहे. ना ओवेसी चा मुख्यमंत्र्यांचा आहे. आमचे आजोबा ब्राम्हण होते असे बोलतात, मात्र माझे तालुक आदब से आहे. खरा भारतीय आदिवासी आहे मात्र भाजप बोलतो, मुघल आले मग महागाई कशी झाली, मुसलमानाचा संबंध मुघलांशी नाही, असंही ओवेसींनी ठणकावून सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.