मुंबई, 24 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर खून प्रकरणात जसजसे दिवस पुढे जातील तसतसे मोठे खुलासे बाहेर येत आहेत. सहा महिन्यांच्या जुन्या खून प्रकरणाची उकल करताना, दिल्ली पोलिसांनी आफताबला श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकड्यांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटक केली. दरम्यान या प्रकरणावर देशभरात राजकीय प्रतिक्रीया उमटत आहेत. दरम्यान यावरून भाजपने हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगितले. यावर आता एमआयएमचे नेते ओवेसींनी प्रतिक्रीया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
ओवेसी म्हणाले की, आफताब आणि श्रद्धा खून प्रकरणावर भाजपचे राजकारण पूर्णपणे चुकीचे आहे. हा लव्ह जिहादचा नाही तर शोषणाचा, महिलेवरील अत्याचाराचा मुद्दा आहे. ही घटना अतिषय निंदनीय आहे याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे.
BJP politics over this is completely wrong. It's not an issue of love jihad but of exploitation, abuse against a woman & that is how it should be viewed & condemned: AIMIM Chief, Asaduddin Owaisi pic.twitter.com/IzPzrQzqUy
— ANI (@ANI) November 24, 2022
हे ही वाचा : भगतसिंह कोश्यारी वारंवार वादग्रस्त वक्तव्य का करतात?, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली Inside story
परंतु याकडे जातीय रंग न देता महिलेवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून विरोध केला पाहिजे असे ओवेसी म्हणाले. काल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आफताब प्रकरणावर वक्तव केले होते.
फडणवीस काय म्हणाले?
ते पत्र माझ्याकडे आले आहे. ते पत्र पाहिल्यांनंतर मला यातील गांभीर्य समजले आहे. ते फार गंभीर पत्र आहे. त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, याचा तपास आपल्याला करावा लागणार आहे. मी कुणावरही आरोप करणार नाही. पण या प्रकारच्या पत्रांवर कारवाई नाही झाली, तर अशा घटना घडतात. त्यामुळे या पत्राचा नक्कीच तपास केला जाईल. जर त्या पत्रावर कारवाई झाली असती, तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता, असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : एक होती श्रद्धा वालकर, कॉलेजमधला जुना VIDEO आला समोर
श्रद्धा वालकर प्रकरणावर दिल्ली पोलिसांची नवी माहिती
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र श्रद्धाने लिहिलं होतं आणि तिच्या मृत्यूपूर्वी तिने आफताबने तिची हत्या करणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तिने हे पत्र/तक्रार महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. हे पत्र 28 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. तक्रार पत्रात श्रद्धाने आफताबकडून केलं जाणारं ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला यासह अनेक गंभीर आरोप केले होते.