मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नांदेडमध्ये सशस्त्र दरोडा, धारदार तलवारी दाखवत पथसंस्थेत भयानक हिंसाचार, पाहा VIDEO

नांदेडमध्ये सशस्त्र दरोडा, धारदार तलवारी दाखवत पथसंस्थेत भयानक हिंसाचार, पाहा VIDEO

नांदेडमधील बँकेत सशस्त्र दरोडा

नांदेडमधील बँकेत सशस्त्र दरोडा

नांदेडमध्ये आज भर दिवसा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती पथसंस्थेवर सशस्त्र दरोडा टाकला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India
  • Published by:  Chetan Patil

अमित राय, नांदेड, 1 ऑक्टोबर : खरं म्हणजे काही घटना इतक्या भयानक असतात की त्याच्या कल्पना देखील करवत नाही. इतकं भयानक खरंच घडू शकतं का? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण वास्तव्यात तशा घटना आजच्या घडीला घडत आहेत. विशेष म्हणजे तशी घटना आज पहिली नाही. गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी अशा घटना समोर येत आहेत. आणि ही घटना म्हणजे बँक आणि पथसंस्थेवर पडत असलेल्या सशस्त्र दरोड्याची. नांदेडमध्ये आज भर दिवसा सशस्त्र दरोड्याची घटना घडली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर अत्यंत रहदारीचा होता, अशी माहिती समोर येत आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी पथसंस्थेत शिरतात आणि नंतर मॅनबंद धारदार तलवार बाहेर काढतात. यावेळी ते कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. अतिशय थरारक हा सगळा प्रकार आहे.

नांदेडमध्ये आज भर दिवसा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती पथसंस्थेवर सशस्त्र दरोडा टाकला. संबंधित घटना ही उमरी तालुक्यातील गर्दीचं ठिकाण असलेल्या सिंधी परिसरात घडली. पाच ते सहा जण दुपारच्यावेळी हातात तलवारी घेऊन पथसंस्थेच्या कार्यालयात आले. त्यांनी धारदार तलवारी मॅनमधून काढत कर्मचाऱ्यांना दमदाटी करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपींनी तलवारीचा धाक दाखवत दोन लाख रुपये लांबवले. अतिशय भयानक ही सगळी घटना होती. ही घटना कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली. या घटनेमुळे पथसंस्थेतील कर्मचारीदेखील भयभीत झाले.

(बापरे! वाशीतून चक्क 1476 कोटींचे ड्रग्ज जप्त, DRI ची सर्वात मोठी कारवाई)

काँग्रेसचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांची ही पथसंस्था आहे. दरोडा पडल्याची बातमी गावकऱ्यांना कळताच गावकऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. यावेळी एक जण गावकऱ्यांच्या हाती लागला. त्याला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरोडा टाकणारे सर्वजण हे नांदेडमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

First published:

Tags: Crime, Robbery, Robbery Case