मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संजय राऊत बाहेर येताच 'मातोश्री'जवळचा आणखी एक नेता अडचणीत, ठाकरेंच्या शिलेदाराला कोर्टाचा समन्स

संजय राऊत बाहेर येताच 'मातोश्री'जवळचा आणखी एक नेता अडचणीत, ठाकरेंच्या शिलेदाराला कोर्टाचा समन्स

शिवसेना नेते अनिल परब यांच्या हात धुवून पाठ लागले आहेत. अनिल परब यांंच्या रत्नागिरी साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा नवीन माहिती समोर आली आहे.

शिवसेना नेते अनिल परब यांच्या हात धुवून पाठ लागले आहेत. अनिल परब यांंच्या रत्नागिरी साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा नवीन माहिती समोर आली आहे.

शिवसेना नेते अनिल परब यांच्या हात धुवून पाठ लागले आहेत. अनिल परब यांंच्या रत्नागिरी साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा नवीन माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 09 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या मागच्या काही माहिन्यांपासून शिवसेना नेते अनिल परब यांच्या हात धुवून पाठ लागले आहेत. अनिल परब यांंच्या रत्नागिरी साई रिसॉर्ट प्रकरणी पुन्हा नवीन माहिती समोर आली आहे. यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रत्नागिरी- मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली न्यालायलाने माजी मंत्री अनिल परब यांच्यासह तिघांना बजावलं समन्स बजावल्याने पुन्हा अनिल परब वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

अनिल परब यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा कलम 15 अन्वये समन्स बजावण्यात आले आहे. याप्रकरणी परब यांना 14 डिसेंबरच्या सुनावणीला हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली न्यायालयात केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर आज (दि.09) सुनावणी झाली याप्रकरणी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा : संजय राऊत जेलबाहेर येताच घरी जाणार नाहीत, तर सगळ्यात पहिले...

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने खटला दाखल केला होता. वकील प्रसाद कुवेसकर यांनी पर्यावरण विभागाच्यावतीने युक्तीवाद केला होता. युक्तीवादानंतर न्यायालयाने समन्स बजावला आहे.

24 तासांत अनिल परबांच्या बाबतीत दोन घटना

अनिल परब यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली रिसॉर्ट फसवणूक प्रकरणी पोलिसांनी हा एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 420 आणि 34 अंतर्गत दापोली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहिती दिली होती की, दापोली पोलिसांनी अनिल परब एएमडी ग्रुपच्या अनधिकृत रिसॉर्टविरोधातील त्यांची तक्रार आणि पुरावे विचारात घेण्याचे मान्य केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी अनिल परब यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

दापोली येथे असलेले रिसॉर्ट परब यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. परब यांनी त्याच्या बांधकामात कोस्टल रेग्युलेशन झोनसह अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. सोमय्या म्हणाले की, दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना या वर्षी जानेवारी महिन्यात मिळाले आहे.

हे ही वाचा : अजित पवार खरचं नाराज? नॉटरिचेबल चर्चेवर सुप्रिया सुळेंचा खुलासा

दापोलीतील या रिसॉर्टची जागा खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी 2019 मध्ये नोंदणी करण्यात आल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये, नोंदणीच्या एका वर्षानंतर, ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना एक कोटी 10 लाखांना विकली गेली असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Anil parab, Dapoli, Environment, Kirit Somaiya