मुंबई, 21 डिसेंबर : 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला असला तरी कोर्टाने दिला दिला नाही. आज मुंबई हायकोर्टाने सीबीआयची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे देशमुखांचा मुक्काम जेलमध्ये वाढला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाला होता पण CBI ने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी CBI ची विनंती स्वीकारली आहे. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला हायकोर्टानं जामीन दिला होता. जामीन मंजूर मात्र CBI विनंती नुसार, अंमलबजावणी साठी 10 दिवस स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यासाठी CBI नं परत मागितली वाढीव मुदत मागितली होती. CBI ची विनंती व्हेकेशन असल्यानं सुप्रीम कोर्टात अपिलात जाण्यासाठी 27 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण, यापुढे कोणतीही मागणी मान्य करणार नाही, असंही कोर्टाने ठणकावून सांगितलं आहे. ‘CBI च्या मागणीत तथ्य नाही. ऑर्डर सेम डे रिलीज झाली. त्यांना वेळ मिळाला नाही या म्हणण्यात तथ्य नाही. व्हेकेशन असणार हे आधीच स्पष्ट होतं. सुप्रीम कोर्ट सुट्टी शेड्युल आधीच जाहीर होतं. CBI ची विनंती अमान्य करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी केली. ( ‘..तर निधी मिळणार नाही, भाजपकडून सरपंचांना फोन’; माजी आमदाराचा गंभीर आरोप ) मंगळवार 3 जानेवारी पर्यंत मुदत द्यावी. व्हेकेशन कोर्टात महत्वाच्या सुनावणी घेतल्या जात आहे. हे CBI ला माहिती आहे. वेळ काढण्यासाठी CBI टाईमपास करतंय. सुप्रीम कोर्टाला हे मॅटर महत्वाचं वाटत नसेल म्हणून त्यांनी सुनावणी घेतली नाही, देशमुख यांचं वय पाहा. सुप्रीम कोर्टानं जामीन रद्द केला तर आम्ही सरेंडर करू, असंही अनिकेत निकम म्हणाले. अनिल देशमुख यांनी याचिकेतील वैद्यकीय आणि गुणवत्तेच्या आधारे जामीन देण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या एकल खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जामीन मंजूर केला होता. सीबीआयने त्यांना या वर्षी एप्रिलमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. ते मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. देशमुख यांच्या प्रकृतीचा विचार करता भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीला प्राधान्य द्यावे, असे प्रथमदर्शनी मत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात सांगितले होते. (अन् सभागृहात भुजबळांनी मफलर पुढे करून भीक मागितली, फडणवीसांनी काढले प्रबोधनकारांचे पुस्तक!) नेमकं प्रकरण काय? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी गंभीर आरोप केले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुखांनी दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले होते, असा आरोप केला होता. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अनिल देशमुख त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि 100 कोटी जमा करण्यास सांगितलं होतं. मुंबईतील वेगवेगळ्या पब आणि बार मालकांकडूनही वसुली केली जाणार असल्याचा दावाही परमबीर सिंग यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.