मुंबई, 16 ऑक्टोबर : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लटके यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राबाबत ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदाराच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोधच होते. विरोधी पक्ष आपला उमेदवार उभा करत नाही. आपलं दुर्दैव किंवा समोरच्या पक्षाच्या मनात काय आहे माहिती नाही. उमेदवार असा आहे त्यामुळे आपण निवडणूक लढवलीच पाहिजे, असं काही त्यांचं असेल. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी माझी इच्छा आहे’, असं ऋतुजा लटके म्हणाल्या आहेत. प्रिय मित्र, देवेंद्र, ‘हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी सुसंगत’ राज ठाकरेंनी काय लिहिलं पत्रात? दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंमत असेल बाळासाहेबांच्या विचारांचं नाव घेत असाल तर उद्याच्या उद्या तुमच्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्या. भाजपच्या उमेदवाराची लाचारी पत्करली आहे ती बंद करा आणि ऋतुजा लटकेंची निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा पाडा, असं माझं म्हणणं आहे, असं विनायक राऊत म्हणाले. फडणवीस यांची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्या उमेदवाराला समर्थन मिळावे म्हणून आशिष शेलार राज ठाकरे यांना भेटायला गेले होते. त्यावेळेस त्यांनी इच्छा आणि मत वक्त केली आणि आता तसे पत्र ही दिले आहे. यापूर्वी अनेकदा योग्य पद्धतीने मागणी झाल्यावर असे निर्णय घेतले आहे. आर आर पाटील असो किंवा काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका असो. पण आता आम्ही उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता या पत्रावर विचार ही करायचा झाला तर मला तो एकटा करता येणार नाही. माझ्या पक्षात मी काही एकटा निर्णय घेत नाही’ असं फडणवीस म्हणाले. ‘बाळासाहेबांची शिवसेना पण आमच्या सोबत आहे. त्यामुळे मला मुख्यंमत्र्यांना पण विचारावे लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंतीच कुठलाही निर्णय घेतला जाईल’ असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.