मुंबई, 26 एप्रिल : अमृता फडणवीस आणि अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, या कार्यक्रमात हे तिघंही एकाच व्यासपीठावर होते. देवेंद्र फडणवीस यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना विचारला, तेव्हा वरती नीट संबंध ठेवा, असं उत्तर त्यांनी दिलं. राज ठाकरे यांच्या या उत्तरानंतर अमृता फडणवीस यांनी तक्रार केली. फडणवीस यांनी वर लक्ष्य दिलं पाहिजे, असं तुम्ही म्हणाला. त्यांनी थोड घरी पण लक्ष दिलं पाहिजे, अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी केली. त्यावर मला तुमच्या घरच्या प्रश्नात नका आणू, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.
देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतही प्रश्न विचारले. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना जपून राहण्याचा सल्ला दिला. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वयंभू असल्याचा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. अजित पवार यांच्याबाबत खेडच्या सभेत बोलू, असं ते म्हणाले. पण ते बाहेर जेवढं लक्ष देत आहात, तेवढं काकांकडे द्या, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवारांनी मारलेल्या डोळ्यावरही राज ठाकरेंनी टोला हाणला. ज्या वयात या गोष्टी करायच्या असतील त्या करायच्या असतात. त्यांच्या या गोष्टी वयात राहून गेल्या असतील म्हणून ते असं करत असतील, असं राज ठाकरे म्हणाले.

)







