मुंबई, 24 ऑक्टोबर : आपल्या युनिक आवाजामुळे आणि या ना त्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता दिवाळीच्या मुहुर्तावर नवीन गाणे रिलीज केले आहे. यावेळी त्यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर लक्ष्मीपूजन आरती गायली आहे.
दिवाळीसह लक्ष्मी मातेशी संबंधित प्रत्येक प्रसंगी ओम जय लक्ष्मी माता आरतीचे पठण केले जाते. या आध्यात्मिक मंत्राच्या समर्पित जपाने घरात समृद्धी आणि बुद्धी येते असेही मानले जाते. याच निमित्ताने अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजात ही आरती गायली आहे.
Times Music Spiritual साठी अमृता फडणवीस यांच्या आपल्या मधुर आवाजात दिवाळी लक्ष्मीपूजन आरती गायली आहे. ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. "#Diwali2022 #लक्ष्मीपूजेच्या या शुभ प्रसंगी, माझी #लक्ष्मी आरती ऐका आणि दैवी भक्तीच्या भावनेत लीन व्हा! प्रेम से बोलो, ॐ जय लक्ष्मी माता ...!" असे ट्विट त्यांनी केले.
On this auspicious occasion of #Diwali2022 #LaxmiPuja , listen to my #LAXMI Aarti and get drenched in the spirit of divine devotion ! प्रेम से बोलो, ॐ जय लक्ष्मी माता …!
👉 https://t.co/sNLDo3P2lq pic.twitter.com/8zVQ3DwZih — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 23, 2022
हेही वाचा - 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अमृता फडणवीस यांचं खास गाणं, पाहा हा VIDEO
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवर, तर कधी कधी सामाजिक विषयांवर अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी सादर केली आहे. याआधी सुद्धा अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत होत्या. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुद्धा अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. 'फिर से' या गाण्याचं लाँचिंग खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं होतं.
बॉलिवूडमध्येही गायिका म्हणून पदार्पण -
अमृता फडणवीस या अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांच्या व्यासपीठावरही अनेकदा गाताना दिसतात. आगामी काळात बॉलीवूड चित्रपटातही त्यांच्या आवाजातील गाणे ऐकायला मिळणार आहे. 'लव्ह यू लोकतंत्र' या सिनेमात त्यांनी एका रोमँटिक गाण्याला आवाज दिला आहे. 'ना जाने क्यू धडका ये दिल' असे या नव्या गाण्याचे बोल आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadnavis, Diwali, Song