जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सुषमा अंधारेंच्या व्याख्यानावरून वाद पेटला, वारकरी पुन्हा पोलीस ठाण्यात

सुषमा अंधारेंच्या व्याख्यानावरून वाद पेटला, वारकरी पुन्हा पोलीस ठाण्यात

वारकरी पुन्हा आक्रमक

वारकरी पुन्हा आक्रमक

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून सुषमा अंधारे या बोलणार आहेत, मात्र आता या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

  • -MIN READ Amravati,Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 16 फेब्रुवारी : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या बोलणार आहेत. मात्र व्याख्यानापूर्वी चांदूर रेल्वे येथील वारकरी मंडळ, बजरंग दल व भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यक्रमापूर्वी प्रमुख वक्त्या सुषमा अंधारे आणि आयोजकांना समज द्यावी यासाठी वारकरी मंडळाच्या वतीनं चांदूर रेल्वे पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनात काय म्हटलं? ‘शहरात सुषमा अंधारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांचा आजपर्यंतचा इतिहास पाहाता त्यांचे भाषण हे नेहमी हिंदू देवी देवतांविरोधात असते. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाने सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी अंधारे यांना आणि आयोजकांना समज देण्यात यावी अशी’ मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. हेही वाचा :  कसबा पोटनिवडणुकीत भाजपची वाढली डोकेदुखी, खासदार बापटांनी घेतली एक्झिट! यापूर्वीही वारकरी समाज आक्रमक दरम्यान सुषमा अंधारे यांच्याविरोधात यापूर्वी देखील वारकरी समाज आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आहे. सुषमा अंधारे या ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ वारकऱ्यांनी घेतली होती. तसेच वारकरी संघटनेकडून अंधारे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वरकऱ्यांनी निवेदन दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात