जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / कसबा पोटनिवडणुकीत भाजपची वाढली डोकेदुखी, खासदार बापटांनी घेतली एक्झिट!

कसबा पोटनिवडणुकीत भाजपची वाढली डोकेदुखी, खासदार बापटांनी घेतली एक्झिट!

जर यावेळी गिरीश बापट नाराज असतील तर याचा फटका भाजपला बसणार हे नक्की मानलं जात आहे.

जर यावेळी गिरीश बापट नाराज असतील तर याचा फटका भाजपला बसणार हे नक्की मानलं जात आहे.

जर यावेळी गिरीश बापट नाराज असतील तर याचा फटका भाजपला बसणार हे नक्की मानलं जात आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 16 फेब्रुवारी : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पण भाजपमधून नाराजीची बातमी समोर आली आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांनी थेट पत्रच लिहिले आहे. कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अशातच गिरीश बापट तब्येतीच्या कारणास्तव आपण प्रचारात सहभागी होऊ शकत नाही असं पत्र लिहिलं आहे त्यामुळे गिरीश बापट नाराज असल्याच्या चर्चा आता पुण्यात रंगू लागल्या आहेत. (कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा, पण… मनसेचं ठरलं!) खरंतर कसबा विधानसभेसाठी गिरीश बापट हे आपल्या सुनेला उमेदवारी देण्यासाठी आग्रही असल्याची देखील बातमी आली होती. पण तसं न झाल्याने गिरीश बापट प्रचारापासून लांब आहेत असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे गुरुवारीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी गिरीश बापट यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती. कसबा मतदारसंघातून गिरीश बापट सहा वेळा आमदार राहिले आहेत, त्यामुळे कसब्यात गिरीश बापटांचे वलय मोठं आहे. जर यावेळी गिरीश बापट नाराज असतील तर याचा फटका भाजपला बसणार हे नक्की मानलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते संजय काकडे देखील प्रचारापासून लांब असल्यामुळे चर्चेला उधाण आला आहे. भाजपकडून 7 तास मॅरेथॉन बैठक दरम्यान, कसबा, चिंचवडबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल पुण्यात पार पडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी ही मॅरेथॉन बैठक घेतली आहे. राज्यातले चार मंत्री बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. मंत्री चंद्रकात पाटील, मंत्री गिरिष महाजन, मंत्री रवींद्र चव्हाण त्यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील बैठकीला उपस्थित होते. (चिंचवडमध्येही मनसेचा भाजपला पाठिंबा पण…; घातली ‘ही’ अट) कसबा, चिंचवडबाबत भाजपाची निवडणूक रणनिती ठरवण्यासाठी रात्री तब्बल सात तास बैठक चालली. त्यासोबतच काल पुण्यातील बडे उद्योजक पुनीत बालन आणि फतेचंद रांका यांच्यासोबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली आहे. फत्तेचंद रांका हे व्यापारी महासंघांचे अध्यक्ष आहेत. रांका यांच्या संघटनेत ४२ हजार व्यापारी आहेत. ७०% पेक्षा जास्त व्यापारी कसबा विधानसभा हद्दीत येतात. कसबा मतदार संघ बाजारपेठांचा परिसर आहेत. व्यापारी महासंघांचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि फडणवीस यांची भेट कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला अनेक गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी देखील लावली होती उपस्थिती लावली. पुण्यातील मानाचे पाचही गणपती कसबा मतदारसंघात येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आता कसबा विधानसभेत लक्ष घातलं असल्याचे दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात