मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Success Story: पारंपरिक शेतीला फाटा, औषधी पिंपळीच्या शेतीतून मिळवला लाखोंचा नफा, Video

Success Story: पारंपरिक शेतीला फाटा, औषधी पिंपळीच्या शेतीतून मिळवला लाखोंचा नफा, Video

X
अमरावती

अमरावती तालुक्यातील कोडगावचे शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करत आहेत. पिंपळीच्या शेतीतून ते लाखो रुपये मिळवत आहेत.

अमरावती तालुक्यातील कोडगावचे शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करत आहेत. पिंपळीच्या शेतीतून ते लाखो रुपये मिळवत आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Amravati, India

  वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी

  अमरावती, 1 मार्च : अलीकडच्या काळात शेतकरी पारंपरिक शेती सोडून विविध प्रयोग आपल्या शेतीमध्ये करत आहेत. अमरावतीतील कोडगाव ता. अंजनगाव सुर्जी येथील शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करत आहेत. गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी पिंपळी या औषधी वनस्पतीची शेती केली आहे. या औषधी वनस्पतीचा उत्पादन खर्च कमी आहे. तसेच बारमाही पीक असल्याने शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

  काय आहे पिंपळ वनस्पती?

  पिंपळी या औषधी वनस्पतीचा उपयोग मानवीय तसेच पशुच्या आयुर्वेदिक, युनानी, तिबेटीयन व लोक औषधात केला जातो. मसाले पदार्थात सुध्दा याचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो. ही बहुवर्षीय बहुगुणीयुक्त वेलवर्गीय वनस्पती आहे. इंग्रजी भाषेत या पिकास लॉंग पेपर या नावाने संबोधले जाते. तर भारतीय भाषेत विविध प्रांतात या पिकास पिंपळी, पान पिंपळी, छोटी पिप्पल, पिप्पल, टिपली. मगधी इत्यादी नावाने ओळखले जाते. या पिकाचे शास्त्रीय नाव पेपर लॉगम असून ही वनस्पती 'पिपरेसी' वनस्पती कुटुंबातील आहे. या पिकाचा विस्तार भारता व्यतीरिक्त दक्षिण पूर्व आशियात आढळतो. पिंपळी या औषधी पिकांचे मूळ उगमस्थान भारतामध्ये महाराष्ट्राव्यतिरीक्त, केरळ, आंध्र प्रदेश, आसाम, बंगाल व उत्तरांचल या प्रदेशात आहे.

  लागवडीचे तंत्रज्ञान आणि जमिन मशागत

  साधारणत: जानेवारी महिन्यात जमिनीची उभी व आडवी खोल नांगरट करून मातीची ढेकळे बारिक करण्याकरिता 2 ते 2 कुळवाच्या पाळ्या आवश्यकतेप्रमाणे दिल्या जातात. यानंतर 1.5 ते 1.75 मीटर लांब व 0.6 ते 0.75 मीटर रुंद या आकाराचे वाफे किंवा वरंबे तयार केले जातात. एका हेक्टर क्षेत्रामध्ये साधारणतः 3 हजार वाफे तयार होतात. पेरणीपूर्व या वाप्यांमध्ये पाटपाणी देऊन वाफसा येउ देतात. अशा वाप्यांमध्ये वरंब्यावर पिंपळीच्या वेलांना आधार तसेच सावलीकरीता 30 ते 40 से. मी. अंतरावर हेटा किंवा पांगरा याची लागवड करतात. सुत्रकृमि तथा विषाणुचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता जमिनेचे सोलरायझेशन प्रस्तापित केले जाते.

  Success Story: गुजरातमधील नोकरी सोडली, झेंडू शेतीतून कमावले लाखो रुपये, Video

  पेरणीची पध्दत, बीज/रोपे प्रक्रिया

  पिंपळीची लागवड जानेवारी ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करतात. याकरीता स्थानिक वेलीचाच उपयोग नविन लागवडीकरीता करतात. केरळ कृषि विद्यापिठाने पिंपळीची 'विश्वम' ही सुधारीत जात प्रसारित केलेली आहे. पिंपळीचे वेलापासून 35 डोळे असलेले, हिरवे, लसलसीत, 15-20 से. मी. लांब कांडे (बेणे) पेरणीकरीता घेतात. पिंपळी पिकाचे 1 लाख 8 हजार बेणे प्रती हेक्टरी लागतात. लागवडीपुर्वी बेणे ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाच्या (1 किलो 10 लिटर पाणी) द्रावणात किंवा बोडोमिश्रण टक्का द्रावणात 30 मिनीटे बुडवून नंतर लावावे. बेण्यास इंडोल बुटेरीक अॅसीड 100 पीपीएम (100 मि. ग्र. एक लीटर पाणी) द्रावणात 7 मिनीटे बुडवुन लावल्यास लवकर मुळ्या फुटुन वेल लवकर वाढण्यास मदत होते. वरंब्यावर दोन वेलीतील अंतर 30 से.मी. घेऊन वरंब्याच दोन्ही बाजूला प्रत्येक ठिकाणी 2-3 बेणे घेऊन लागवड करावी व त्यानंतर लगेच ओलीत करावे.

  Success Story : अबब! तब्बल पाऊण किलोचा कांदा! विश्वास बसत नसेल तर पाहा Video

  आंतर मशागत कामगाराची आवश्यकता

  वेल वाढण्यास सुरवात झाल्यानंतर आधाराकरीता वेलीला लव्हा नावाच्या गवताने किंवा प्लास्टीक दोरीच्या सहाय्याने संभालुच्या काड्या, पांगरा किंवा हेट्यास बांधावे. ही बांधणी जुलै ते ऑगस्ट पासून सप्टेंबर ते आक्टोबर पर्यंत करावी लागते.या वाढीच्या काळात चाफा तणरहीत ठेवावा. या करीता पेरणीपासून साधारणतः 2 ते 3 खुरपणीची वेल वाढणीच्या काळात आवश्यकता पडते. वेलींना वर्षातून एकदा मे ते जून महिन्यात उखरी करून मातीचा भर द्यावा. वेल वातावरणास संवेदनशील असल्यामुळे मळ्याच्या चारही बाजुने गवत, तुराट्या व इतर पालापाचोळा याचा 1.7 ते 1.75 मीटर उंचीचा आडोसा मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये तयार करावा लागतो. यामुळे वेलींचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण होते.

  Success Story: वर्ध्यात बहरली 'ड्रॅगन फ्रुट'ची शेती, शेतकरी घेतोय लाखोंचे उत्पन्न, Video

  प्रति हेक्टरी उत्पादन

  पिंपळी फळांचे वाळवून 7 ते 10 क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळते. याचे विपणन उत्पादन शेतकरी आवश्यकते प्रमाणे स्थानिक किंवा राष्ट्रीय बाजारपेठेत करतात. या पिकास साधारणतः मागणीनुसार 250 ते 700 रु. प्रती किलो भाव मिळतो. याची बाजारपेठ दिल्ली, निमच, मुंबई येथील औषधी वनस्पतीच्या मंड्या आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Agriculture, Amravati, Local18